आरोग्य व शिक्षणदेश विदेशमनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक

विकसित भारत संकल्प यात्रा’अंतर्गत गुरुवारीविविध गावांमध्ये शासकीय योजनांची दिली जाणार माहिती

सुशिल वाघमारे संपादक

लातूर, दि. 20 (महावार्ता news): केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचाव्यात, तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ही विशेष मोहीम 24 नोव्हेंबर, 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत गुरुवारी, 21 डिसेंबर, 2023 रोजी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी करण्यात आहे. तरी संबंधित गावातील नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहण्याचेआवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.

21 डिसेंबर,2023 रोजी अहमदपूर तालुक्यात सकाळी मोघा, दुपारी धानोरा खु., औसा तालुक्यात सकाळी वरवडा, हारेगाव, दुपारी जायफळ व जवळगा पो., चाकूर तालुक्यात सकाळी आनंदवाडी, दुपारी अलगरवाडी, देवणी तालुक्यात सकाळी कोनाळी, दुपारी दरेवाडी, जळकोट तालुक्यात उमरदरा, दुपारी केकतसिंदगी, लातूर तालुक्यात सकाळी चिंचोलीराव, जवळा बु., दुपारी चिंचोलीराव वाडी, चिंचोली ब, निलंगा तालुक्यात सकाळी सोनखेड, हणमंतवाडी अबु., दुपारी चांदोरी व अबुलगा बु., रेणापूर तालुक्यात सकाळी सारोळा, दुपारी कारेपूर, उदगीर तालुक्यात सकाळी एकूर्का रोड, दुपारी मन्ना उमरगा येथे विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button