
सार्वजनिक स्मशानभूमि चाकूर प्रभाग क्र.14 सिमेंट रस्ता व दोन शेड बांधकाम करणे या कामाचा भूमिपूजन विद्यमान नगराध्यक्ष कपिल माकने यांच्या हस्ते पार पडला. सुमारे ₹50लक्ष निधीतून हे काम करण्यात येणार आहे.
हा 50 लक्ष निधी आमदार बाबासाहेब पाटील यांनी सार्वजनिक स्मशानभूमी विकासासाठी उपलब्ध करून दिलेला आहे.
याप्रसंगी नगरपंचायत चाकूर चे मुख्यधिकारी अजय नरळे ,उपाध्यक्ष अरविंद बिराजदार ,नगरपंचायत चाकूर गटनेते करीमसाब गुळवे चाचा ,विकास विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन डॉ.गोविंदराव माकणे, पप्पन कांबळे, बाळू लाटे, इलियास सय्यद, संजय पाटील, नरसिंग गोलावर आणि नागरिक उपस्थित होते.