पुसेसावळी येथील हल्लेखोरांना फाशीची शिक्षा द्यावी, जलदगती न्यायलयात खटला चालवावा
महावार्ता न्यूज / सुशिल वाघमारे

पुसेसावळी येथील हल्लेखोरांना फाशीची शिक्षा द्यावी-चाकुरात मुस्लीम समाजाची मागणी
जलदगती न्यायलयात खटला चालवावा
महावार्ता न्यूज चाकुर ता.प्रः-पुसेसावळी येथे काही समाज कंटकांनी दोन निष्पाप जणांचा बळी घेतला व धार्मिक स्थळाचे आणि मुस्लीम समाजाच्या घराला जाळपोळ करून आर्थिक नुकसान करणाऱ्या हल्लेखोरांना शासनाने तात्काळ अटक करून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी चाकुर येथील मुस्लीम समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे तहसिलदार रेणुकादास देवणीकर यांना मागणीचे निवेदन देऊन केली आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात गुंड प्रवृतिच्या जमावाने धार्मिक दंगल घडवुन अल्पसंख्याक समुदायातील एका मुस्लिम तरुणांची हत्या करण्यात आली. जमावाने घरांची दुकानांची नासधुस करत दोनचाकी व चारचाकी वाहने जाळत दहशत निर्माण केली त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा चाकुर येथील मुस्लिम समाजाच्या वतीने तिव्र निषेध व्यक्त करत येते. यातील दोषींना तात्काळ अटक करा व सदर प्रकरण जलदगती न्यायालयाद्वारे चालवुन त्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दि. 15 सप्टेंबर रोजी देण्यात आले. सदरची घटना ही सोशल मिडीयावर आक्षेपाहर्य पोस्ट कमेंट टाकल्यामुळे दोन गटात वाद निर्माण झाला होता यामुळे मोठ्या जमावाचा गावात मोर्चा काढण्यात आला मोर्चा निघाल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी अल्पसंख्याक मुस्लीम समाजावर हल्ला केला. यात एकाचा खून झाला, जाळपोळ झाली, गाड्या जाळल्या असे नुकसान झाले पण या वादात एकाला जिव गमवावा लागला त्या मृत्यू पावलेल्या युवकाच्या परिवारास ५० लाख रूपयाची त्वरित आर्थिक मदत करावी व त्यांच्या वारसाना शासकिय नौकरी द्यावी तसेच गंभीर जखमी झालेल्यांना १० लाख रूपयाची शासनाने मदत करावी त्याचबरोबर घरे, दुकान, वाहने जळालेल्या नुकसान ग्रस्तांना आर्थिक नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली.निवेदन देताना चाकुर शहरातील असंख्य मुस्लीम बांधव उपस्थित होते.
मुस्लिम समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केला जात आहे.पुरोगामी महाराष्ट्र राज्यात अंल्पसंख्याक समुदायावर दिवसेंदिवस अन्याय अत्याचाराच्या घटना वाढच आहेत.महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिला काळी फासणाऱ्यां घटना होत आहेत. त्यामुळे मुस्लिम समाज दडपणाखाली भयभीतपणे जीवन जगत आहे. त्यामुळे या अल्पसंख्यांक समाजाला नोकरीमध्ये आरक्षण व संरक्षण द्यावे आणी कठोर कायदे करण्यात यावे. जलदगती न्यायलयात प्रकरण चालऊन आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली.