आरोग्य व शिक्षणदेश विदेशमहाराष्ट्रसामाजिक

विकसित भारत संकल्प यात्रा’ अंतर्गत आज विविध गावांमध्ये शासकीय योजनांची दिली जाणार माहिती

लातूर, दि. 10 (महावार्ता न्यूज) : केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात, तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ही विशेष मोहीम 24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत सोमवार, 11 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे.

लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी करण्यात आहे. तरी संबंधित गावातील नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहण्याचेआवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.
11 डिसेंबर,2023 रोजी अहमदपूर तालुक्यात सकाळी आनंदवाडी, दुपारी सय्येदपूर खु., औसा तालुक्यात सकाळी एरंडी, दुपारी आलमला, चाकूर तालुक्यात सकाळी अजन्सोंडा, दुपारी जानवळ, देवणी तालुक्यात सकाळी हंचनाळ, दुपारी वागदरी, जळकोट तालुक्यात मंगरुळ, दुपारी बोरगांव खु., लातूर तालुक्यात सकाळी शिवणी खु, दुपारी सेलू बु., निलंगा तालुक्यात सकाळी मिरगणहळही व कलांडी, दुपारी देवीहल्लाळी व बसपूर, रेणापूर तालुक्यात सकाळी कोळगाव, दुपारी निवाडा, शिरुर अनंतपाळ तालुक्यात सकाळी वांजरखेडा, दुपारी हिसामाबाद, उदगीर तालुक्यात सकाळी तिवटग्याळ, दुपारी हैबतपूर येथे विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button