प्रकाश आंबेडकरांनी घेतला नारायण रानेचा समाचार काय म्हणाले पहा
महावार्ता न्यूज लातूर संपादक सुशील वाघमारे

लातूर महावार्ता न्यूज :नारायण रानेनी व त्यांच्या पुत्राने वंचित चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याविषयीं गरळ ओकली होती याबाबत प्रश्न उपस्थित केला असता 1ऑक्टोबर सोमवारी लातूर येथे संपन्नझाली
पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हणाले की “नारायण राणेला मी एवढेच सांगतो ,चिंदी चोराने माझ्याशी वाद घालू नये. मी बाबासाहेबांचा नातू आहे. एक राजकीय पक्षाचा अध्यक्ष जरी असलो की या देशातील अनेक अधिकारी आहेत बाबासाहेबांना या देशाचे जनक माणतात आणि म्हणून तेच अधिकारी मला असणारे माहिती देत असतात आणि या घटना घडू नये ही अपेक्षा त्याठीकाणी असते.
तेव्हा सर्व भारतीयांना माझा असणारा आव्हान आहे डोकं भडकवण्याचं कामकाज होणार का तर निश्चितपणे होणार आहे. जो सामंजस्य मुस्लिम बांधवांना दाखवला आहे. ईद-ए-मिलाद सन गणपतीच्या दिवशी साजरा करणार नाही. शांततेच्या मार्गाने गणपती विसर्जन करा आम्ही दुसऱ्या दिवशी साजरी करू. हे सामंजस्य वाखानण्यासारखा आहे समजून घेण्यासारखा आहे. दिवाळीनंतर परिस्थिती बेकाबू जाण्याच्या जी शक्यता दंगलीच्या माध्यमातून होण , गोंद्रा आणि मणिपूर पुन्हा या देशात होणार नाहीत याची दक्षता सर्वसामान्य माणसांनी घेतली पाहिजे असे मी आव्हान करतोय मानवतेला कुठेही काळीमा लागणार नाही सरकारने जशी घ्यायची असते तशी भारतीय नगरिकांकांची असते तसे ते घेतील अशी अपेक्षा मी बाळगतो असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये संबोधित केले.