निजामकालीन शाळेच्या ईमारत बांधकामासाठी निधी मंजूर करा शिक्षणाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
अहमदपूर (सुशिल वाघमारे/महावार्ता न्यूज)

अहमदपूर शहरातील निजामकालीन असलेली आणी अतिशय जिर्ण झालेली जि.प.प्रशाला अहमदपूर या शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी तातडीने अराखड्यात समावेश करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी युवकनेते डाॅ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाने मॅडम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मंगळवारी लातूर येथे शिक्षणाधिकारी यांची भेट घेवून सम्राट मित्रमंडळ-लातूर अहमदपूर च्या वतीने त्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.यात पूढे म्हटले आहे की,सदरील प्रशाला ही निजामकालीन खूप जूनी असून या इमारतीस शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत. सदरील शाळेमध्ये या पूर्वी छोटे मोठे अपघात झालेले आहेत.मध्यंतरी शाळेच्या भिंतीचा गिलावा कोसळल्याने विद्यार्थी सूध्दा जखमी झाल्याची घटना ताजी आहे.सदरची शाळा हे अहमदपूरचे वैभव आहे.इतर जि.प.शाळेच्या तूलनेत येथील शाळेत विद्यार्थ्यांची संख्या सूध्दा बऱ्यापैकी आहे.त्यामूळे या शाळेच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करणे अत्यंत आवश्यक आहे.यासाठी गेल्या वर्ष दोन वर्षा पासून जनतेतून मागणी असून याचा पाठपूरावा चालू आहे.
निजामकालीन शाळांच्या नवीन इमारत बांधकामासाठी तातडीने अराखडा तयार करून शासनाकडे निधी मागणी करावी आणी यात जि.प.प्रशाला अहमदपूर शाळेचा समावेश करून निधी मंजूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.तसेच शिक्षणाधिकारी यांच्या समवेत सदरील विषयावर सविस्तर चर्चा सूध्दा केली.
या शाळेच्या बांधकामासाठी शासनस्तरावर निधीसाठी प्रस्ताव पाठवून निधी मंजूरीची प्रक्रीया करण्याचे अश्वासन शिक्षणाधिकारी यांनी शिष्टमंडळास दिले.
या निवेदनाच्या प्रती शिक्षणाधिकारी (माध्य.) लातूर,मुख्यकार्यकारी अधिकारी,जि.प.लातूर यांच्या बरोबर शिक्षणमंत्री ना.दिपक केसरकर, पालकमंत्री मा.गिरीष महाजन,मंत्री ना.संजय बनसोडे यांना दिल्या आहेत.