ताज्या घडामोडीराजकीय

केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांची आमदार बाबासाहेब पाटील यांनी घेतली भेट !

चाकूर -( सुशिल वाघमारे/ महावार्ता न्यूज)

चाकूर -( सुशिल वाघमारे/ महावार्ता न्यूज)

भारतमाला परीयोजना अंतर्गत नॅशनल हायवे क्र.३६१ चाकुर लोहा भाग कि.मी 114/600 व ते 187/800 रस्त्याचे चौपरदीकरण करणे (हायब्रिड ॲन्युईटी मोड अंतर्गत) अहमदपूर, शिरुर ताजबंद आणि चाकुर शहरातील रस्त्याची वन टाईम सुधारणा करण्याच्या कामाबाबत दि. 22/ 08/ 2023 मंगळवारी केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथील निवासस्थानी चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधत मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामाबाबत चर्चा केली.

भारतमाला परीयोजना अंतर्गत चाकूर नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्र.361 या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नांदेड यांच्या पथावर आहे. सदर राष्ट्रीय महामार्गाचा भाग अहमदपूर, शिरुर ताजबंद आणि चाकूर या शहरातुन जात असल्याने वाहतुक व बाजारपेठ च्या दृष्टीकोनातून सदर रस्त्याची सिमेंट कॉक्रीट रस्त्याने चौपदरीकरण अत्यंत आवश्यक आहे. यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी अहमदपुर, शिरुर ताजबंद आणि चाकूर शहरातील जाणाऱ्या रस्त्यासाठी सिमेंट कॉक्रीट रस्त्याची One Time सुधारणा करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे.

सदर कामाची निकड लक्षात घेता सदर रस्त्याचे काम सध्या प्रगतीत असलेल्या कामाचे कंत्राटदार कडून मुळ निविदच्या अनुषगांने काम हाती घेतल्यास सदर रस्त्याचे काम त्वरीत करणे शक्य होईल व जनतेस कमी वेळात चांगल्या दर्जाचा रस्ता वाहतुक व दळणवळणासाठी उपलब्ध होऊ शकेल. सदर कामाची वेगळी नवीन निविदा काढल्यास निविदा प्रक्रियेमध्ये व तसेच कार्यारंभ आदेश निर्गमीत करण्याच्या प्रक्रीयेमध्ये तसेच कार्यारंभ आदेश निर्गमीत केल्यावर नविन कंत्राटदार यांच्याकडून यंत्रसामग्री व मनुष्यबळ प्लान्ट उभारणी करण्याच्या कामामध्ये अधिक चा वेळ लागणे साहजिक आहे. अहमदपूर, शिरुर ताजबंद आणि चाकूर शहरातील मंजूर सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे काम मुळ कंत्राटदारामार्फत हाती घेण्यासाठी योग्यती कार्यवाही करुन सहकार्य करावे, अशी मागणी आमदार बाबासाहेब पाटील यांनी निवेदनाद्वारे मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे केली.

यावेळी व्हा.प्रेसिडेंट सिद्धी शुगर अँड अलाईड इंड लि.उजनाचे पी.जी.व्होनराव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button