
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या चाकूर महीला तालुका अध्यक्ष पदी शंकुतला शेवाळे यांची दि 16 /08/2023 रोजी मुंबईत येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी महीला महाराष्ट्र प्रदेश च्या राज्याध्यक्ष रुपालीताई चाकनकर व मान्यवर यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या हस्ते शकुंतला शेवाळे यांच्या आज पर्यंत च्या राष्ट्रवादी पक्षाच्या वाढीसाठी अमुल्य योगदानाबद्दल त्यांची राष्ट्रवादी महीला चाकूर तालूका अध्यक्ष पदी निवड पत्र देवून नियुक्ति करण्यात आली आहे ही नियुक्ती मुंबईत एका नियोजित महीला आघाडी च्या कार्यक्रमात करून उपमुख्यमंत्री व महीला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर व मान्यवर ,महीला आघाडी च्या राज्य व लातूर जिल्हा पदाधिकारी उपस्थित होत्या. निवडी बद्दल शेवाळे यांना पुढील पक्षाच्या बांधणी व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शेवाळे यांच्या महीला आघाडी चाकूर तालूका अध्यक्ष निवडी बद्दल चाकूर/अहमदपूर चे मा आमदार तथा लातूर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ही शकुंतला शेवाळे यांना पुढील पक्षाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत शेवाळे यांच्या निवडी बद्दल चाकूर तालूका व सबंध लातूर जिल्ह्यातुन अभिनंदन होत आहे.