मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे फॉर्म मोफत भरून मिळणार.
नगरसेविका ज्योती शिवदर्शन स्वामी यांचा बहिणीसाठी खास मदत.

चाकूर महावार्ता न्यूज:
माझी लाडकी बहीण योजनेला दिवसेंदिवस मिळणारा प्रतिसाद पाहता चाकूर शहरातील बहिणींची गैरसोय होऊ नये म्हणून नगरपंचायतच्या माजी सभापती नगरसेविका ज्योती शिवदर्शन स्वामी यांनी या योजनेचे फॉर्म मोफत भरून देण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
या योजनेच्या महिलांना महिन्याला १५०० रुपये राज्य शासनाकडून मिळणार असून फॉर्म भरणेसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या महिलांची गैरसोय, त्यांना फॉर्म भरण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी नगरसेविका ज्योती स्वामी यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून मोफत फॉर्म भरण्याची व्यवस्था केली आहे.
सदरील फॉर्म भरण्याची सुरुवात गुरुवारी ११ जुलै पासून करण्यात येणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ०६ पर्यंत फॉर्म भरण्यासाठी येथील जानकर वेल्डिंग,नविन बसस्थानक समोर व्यवस्था केली आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मोफत भरून घ्यावे असे आवाहन माजी सभापती तथा नगरसेविका ज्योती शिवदर्शन स्वामी यांनी केली आहे.