लातूर शहरात विविध ठिकाणी स्काय वॉक पादचारी मार्ग सुरु करण्याची कॅबिनेट मंत्री बनसोडे यांना मागणी
ॲड प्रदीपसिह गंगने यांचे कॅबिनेटमंत्र्या साकडे

लातूर सुशिल वाघमारे/संपादक महावार्ता दि.१९.०९.२०२३ रोजी आम्ही लातूरकर युवक कृती समितीच्या वतीने राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री ना संजय जी बनसोडे यांना लातूर शहरात फुटपाथ वरील अतिक्रमण व रस्त्यावरील वर्दळ पाहता आकाश मार्ग (स्काय वॉक) पादचारी मार्ग सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे .
लातूर शहरातील अनेक शाळा, महाविद्यालय चौकालगतच्या फुटपाथवर अतिक्रमण झाल्याने नागरीक, विद्यार्थी, महीला, मुले हे रस्त्याच्या दोन्ही बाजूने चालण्यासाठी वापर करतात त्यामुळे रस्त्यावर मोठया प्रमाणात वर्दळ होत आहे. त्यामुळे आकाश पादचारी मार्गाची आवश्यकता असून १) जिल्हा न्यायालय लातूर पश्चिम बाजु ते उपविभागीय कार्यालय लातूर २) देशिकेंद्र विद्यालय ते लोकमान्य टिळक चौका कडे जाणारा रस्ता ३) औसा रोड पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन महाविद्यालय ते मुलीचे हॉस्टेल लगत ४) दयानंद महाविद्यालय गेट कोपरा ते ईदगाह मैदान ५) स्वामी विवेकानंद दक्षिण उत्तर बाजु ६) लोकमान्य टिळक चौक दक्षिण उत्तर रस्ता ६) रेणापूर नाका पूर्व पश्चिम रस्ता आदी ठिकाणी आवश्यकतेनुसार आकाश मार्ग (स्काय वॉक) पादचारी मार्ग कार्यान्वित केल्यास लातूर शहरातील विद्यार्थी, युवती, युवक, महीला, नागरिकांची रस्ता ओलाडन्यात होणारी गैरसोय दूर होवून, छोटे, मोठे अपघात टाळले जाऊ शकतात.
त्यामुळे संबधिताना योग्य ते आदेश देण्याची विंनती ना संजय बनसोडे यांना करण्यात आली असून यावेळी आम्ही लातूरकर युवक कृती समितीचे अँड प्रदिपसिंह गंगणे उपस्थित होते तर निवेदनावर ताहेरभाई सौदागर, अँड सुहास बेंद्रे, बालाजी अप्पा पिंपळे, भीमराव दूनगावे, जम्मालोद्दिन मणियार, योगेश गवळी, यशवंत चव्हाण आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत