माजी सभापतीच्या गळ्यात तालुकाध्यक्ष पदाची माळ
पंचायत समितीच्या स्थापनेपासून प स सदस्य, सभापती, उपसभापती , प्रचंड जनसंपर्क असनारे नेतृत्व वसंतराव डिगोळे

चाकूर: (सुशिल वाघमारे) मागील काही दिवसापूर्वी असंख्य इच्छुक उमेवारांनी भारतीय जनता पक्षाचा पदसिद्ध अध्यक्षपदी निवड व्हावी यासाठी मुलाखती दिल्या होत्या. यासाठी तालुक्यातील अनेक नेत्यांच्या चाहत्यांच्या जावळीकता असणाऱ्या नेतृत्वानी फिल्डींग लावली होती. अहमदपूर चाकुर विधानसभा मतदासंघात भाजपाचे गटबाजीचे समीकरण सर्वश्रुत आहेच. साहेब,दादा,मालक,भाऊ ,काका यांच्या गटातटाच्या राजकारणाने विधानसभा हातून गेली असल्याचे समान्य जनतेतून बोलले जात आहे.
यातच चाकूर पंचायत समितीच्या स्थापनेपासून रोहिना सर्कल मद्ये पंचायत समिति सदस्य म्हणून ४ वेळा भाजपाच्या टिकिटावर निवडून आलेले सदस्य.यापूर्वी १० वर्ष भारतीय जनता पक्षाने तालुकाध्यक्ष पदाची दुरा हाती दिली होती. ती यशस्वीपणे सांभाळणारे, पंचायत समितीचे एक टर्म सभापती,एक टर्म उपसभापती पद भूषविले आहे. दोन वेळा जिल्हा महामंत्री म्हणुन जवाबदारी साकारली आहे. गटातटाच्या राजकारणाचा कसलाही संकुचित विचार मनात न आणता पंचायत समितीच्या निवडुकीत विजयश्री खेचून आणणारे तालुक्यात चांगला जनसंपर्क असनारे वसंतराव डिगोळे यांची पक्ष श्रेष्ठी ने प्रत्यक्ष मुलखत व अनुभवावरून निवड केली आहे. जुन्या , जाणत्या, पक्ष कार्यकर्त्याला न्याय दिला आहे.
यांच्या निवडीबद्दल कार्यकर्त्यातून आनंद व्यक्त केला जात आहे. नूतन अध्यक्ष वसंतराव डिगोळे यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. पक्ष संघटना/ बांधणी योग्य रित्या वसंतराव डिगोले यांच्या नेतृत्वखाली परिपूर्ण होईल अशी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यातून चर्चा जोर धरते आहे..