मनोरंजन
प्रभुराज प्रतिष्ठान, लातूर च्या वतीने अभिनव उपक्रम “एक गणपती एक झाडं, घरोघरी गणपती तिथे एक झाडं”
महावार्ता न्यूज /संपादक सुशिल वाघमारे

प्रभुराज प्रतिष्ठान, लातूर च्या वतीने अभिनव उपक्रम
“एक गणपती एक झाडं, घरोघरी गणपती तिथे एक झाडं”
दि.१९.९.२०२३ रोजी संभाजी नगर खाडगाव रोड परिसरात प्रभुराज प्रतिष्ठान,लातूरच्या वतीने 251 तुळशीचे झाडं वाटप करण्यात आले.
नागरिकांना एक गणपती सोबत एक झाडं वाटप करून झाडांचे संवर्धन करूया हा संदेश देण्यात आले.तसेच दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी गणपती बाप्पा कडे साकडे घालण्यात आले.
यावेळी अँड.अजय कलशेट्टी,अल्का घोडके,सामाजिक कार्यकर्ते समर साखरे, महेश पाटील, पवन शिंदे, अंकुश चव्हान, बबलू पाटील, सचिन भोसले, गोपाळ खंडागळे, राहुल शिंदे, सुनील शिंदे, आदी उपस्थित होते.