
चाकूर (प्रतिनिधी) चाकूर शहरातील मानाचा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या आझाद हिंद गणेश मंडळाच्या “श्री” ची स्थापना पारंपारिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्साह करण्यात आली,
शहरातील आझाद चौकातील आझाद हिंद गणेश मंडळाला गेल्या ५५ वर्षाची जुनी परंपरा असून लोकमान्य टिळकांनी गणपतीची स्थापना करून सुरूवात केली व हिंदू धर्म कसा एकत्रित येईल यासाठी प्रयत्न केले,आझाद हिंद गणेश मंडळानेपण आजपर्यंतच्या कार्यकाळात लोकमान्य टिळकांचे विचार आत्मसात करून धार्मिक,संस्कृती, सामाजिक बांधिलकी जोपासत कार्य करत आहे,मंडळाच्या “श्री” ची स्थापना मंडळाचे माजी अध्यक्ष सुरज सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी मंडळाचे अध्यक्ष,संदीप पाटील उपाध्यक्ष,हणमंत शेळके,ओमप्रकाश लोया,अभय सुवर्णकार, पारिजात सुवर्णकार, कौस्तुब सुवर्णकार, अशोक शेळके,मेघराज बाहेती,संजय पाटील, गुणवंतराव जानकर,पार्थ बाहेती,हिमांशू बाहेती, प्रेम सुवर्णकार,अथर्व जोशी,आशुतोष सुवर्णकार, सर्वआकर्षन कर्डिले,आदित्य सुवर्णकार,मंथन मोरे,सौरभ सोमवंशी, श्याम सुवर्णकार,तुषार गिरके सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते, यावेळी महाप्रसाद भाविकांनी लाभ घेतला.