प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या जन्मदिनी चाकूरात भव्य रक्तदान शिबिर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न
चाकुर : (सुशिल वाघमारे) भाजपा युवा मोर्चा च्या वतीने चाकुर शहरातील स्वामी विवेकानंद चौक येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त २१ सप्टेंबर रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
लातुर येथील न्यु अर्पण रक्तपेढीकडुन रक्त संकलन करण्यात आले.यावेळी ५२ रक्तदात्यांनी रक्तदान करुन शिबीर यशस्वी केले.मा.जि.प सदस्य युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाकुर शहर युवा मोर्चा चे शहराध्यक्ष गजानन करेवाड, संयोजक आनंद बेजगमवार, सरचिटणीस विश्वनाथ काथवटे यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर घेण्यात आले.
या शिबीराचे उदघाट्न भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, भाजपा प्रवक्ते गणेशदादा हाक्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आ.बब्रुवानजी खंदाडे, भाजपाचे नुतन ता.अध्यक्ष.वसंत डिगोळे, उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार,नगरसेवक नितीन रेड्डी, शहराध्यक्ष प्रशांत बिबराळे, नगर सेवक साईप्रसाद हिप्पाळे, अंकुश जनवाडे, ॲड.विवेकानंद उजळंबकर,संतोष माने, रवींद्र निळकंठ, शिवम देवशेटवार, रुद्रा होळदांडगे, दिपक जनवाडे आदि मान्यवर उपस्थित होते त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भाजपा कार्यकर्तासह मुस्लिम बाधवांनी या रक्तदान शिबीरात सहभाग नोंदवला यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर युवा मोर्चा च्या वतीने गजानन करेवाड व संयोजक आनंद बेजगमवार यांनी रक्तदात्यांचे सहकार्यांचे आभार मानले.