साकोळ येथील जनतेशी माजी मंत्री पाटील यांनी साधला संवाद.
देशहितासाठी पुन्हा एकदा देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्याकडे हवे.

लातूर महावार्ता न्यूज: महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचारार्थ साकोळ येथे ‘नमो संवाद’ सभा मंगळवारी संध्याकाळी ९ वाजता पार पडली. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून महायुतीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये देशातील गोरगरीब जनतेचा सर्वांगीण विकास झाला आहे. आज शेतकऱ्यांना पिक विमा, सन्मान निधी, कर्ज योजना अशा विविध माध्यमातून लाभ मिळत आहे. महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी कार्य होत आहे. युवकांच्या विकासासाठी नवीन धोरणे तयार केली जात आहेत.
गाववाड्यांचा झालेला हा विकास आगामी काळात देखील असाच सुरू ठेवण्यासाठी आदरणीय मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे गरजेचे असून यासाठी महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन सर्वांना केले.
देश हितासाठी व सामजिक ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी , आर्थिक क्रांती घडवून आणायची असेल तर पुन्हा एकदा देशाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सारखे नेतृत्व गरजेचे आहे. महायुतीला मत म्हणजे देशहिताला मत असे उद्गार उमेदवारी सुधाकर शृंगारे यांनी जनतेला संबोधित करताना काढले.
प्रसंगी महिला नेतृत्व अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी आपला राजकीय प्रवास हा भारतीय जनता पार्टी सोबत का सुरू केला. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी एका सक्षम नेतृत्वाची गरज असते आणि ते सक्षम नेतृत्व म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर शिंगारे यांना आपले अनमोल मतदान करून भारतीय लोकशाही बळकट करावी असे आवाहन साकोळ व परिसरातील जनतेला डॉक्टर पाटील यांनी केले.
यावेळी डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, रा. कॉ. चे पंडीत धुमाळ, जि.प. चे माजी सभापती गोविंद चिरकुले, ऍड. संभाजीराव पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी सभापती संजय दोरवे, भाजपा जिल्हा सचिव भरतजी चामे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सुधीर पाटील, शिवसेना संघटक गुणवंत पाटील,
तालुकाप्रमुख विकास शिंदे,निलंगा विधानसभा प्रभारी दगडु सांळुके, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, मल्लिकार्जुन भिक्का,प.स.च्या माजी सभापती वर्षाताई भिक्का, सुमित्राताई जाधव, संतोष डोंगरे, ऍड. जयश्रीताई पाटील, रिपाईचे मधुकरराव कांबळे आदींसह पंचक्रोशीतील मतदार बहुसंख्येने उपस्थित होते.