चाकूर सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
ISO मानांकन प्राप्त विशाल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी

महावार्ता न्यूज चाकूर: येथील विशाल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे 68 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन डॉक्टर गोविंदराव माकने यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी संस्थेच्या परिसरात संपन्न झाली.
चाकूरच्या या सोसायटीचा नावलौकिक सहकार क्षेत्रामध्ये राज्यभर आहे. विशाल विविध सेवा सहकारी सोसायटी ही सभासदांच्या हिताचे अनेक हितकारक निर्णय घेण्यामध्ये प्रसिद्ध आहे. या सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांना बाजारभावापेक्षा कमी दराने 50 किलो साखर व पंधरा टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय सोसायटीच्या वतीने यावेळी घेण्यात आला. प्रसंगी या संस्थेकडून खते औषधे बी बियाणे खरेदी करणाऱ्या सभासदांचा सन्मान यावेळी करण्यात आला सोसायटीच्या माध्यमातून विविध सामाजिक व शेतकरी सभासदांच्या हिताचे उपक्रम राबवण्यात येतात येणाऱ्या काळातही अशाच प्रकारचे बहुआयामी उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे चेअरमन डॉक्टर गोविंदराव माकणे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. प्रसंगी व्हाईस चेअरमन बालाजी तलवारे, संचालक जाकीर कोतवाल, राधाकिशन तेलंग, शिरीष रेड्डी, अजय नाकाडे, मन्मथ पाटील, अनिता अलमाजी, निर्मला फुलारी, दिगंबर मोरे , दिलीप कोलावार, हनुमंत उस्तुर्गे नारायण बेजगमवार , सत्यविजय कुलकर्णी, व्यवस्थापक कपिल अलमाजी, लक्ष्मण उमाटे सोसायटीचे कर्मचारी शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.