सलग दुसऱ्यांदा अश्विन भोसले यांचे तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या युवकाच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

चाकूर:तालुक्यातील हाळी खुर्द येथील ग्रामपंचायतच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदाची नुकतीच निवड करण्यात आली.
सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असणारे युवक नेतृत्व अश्विन भगवानराव भोसले यांना ओळखले जाते. मागील वर्षे सर्वानुमते बिनविरोध भोसले यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. सन २०२४-२५ च्या अध्यक्ष पदासाठी ग्रामसेवक रविंद्र क्षीरसागर सरपंच प्रचीता संजय भोसले ,उपसरपंच रमेश शिंदे , ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत निवड अध्यक्ष पदी अश्विन भगवानराव भोसले तर उपाध्यक्षपदी निवृत्ती चामले यांची करण्यात आली.
प्रसंगी बाबू सय्यद, इमाम भाई डागवाले, इंदुबाई भालेराव, ललिता भोसले, गणेश जाधव, प्रयागबाई नरहारे, हलिमाबी पटेल , सोसायटीचे चेअरमन जलील पटेल, पोलीस पाटील साहेबराव पाटील, बीट जमादार गोविंद बोळंगे, रवी वाघमारे तलाठी रोहिणी गायकवाड, कृषी सहाय्यक सचिन पंडगे, शालेय समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांची उपस्थिती होती. निवडबद्दल गजानन शिंदे, शशिकांत शिंदे , बाळू चांगले कमलाकर पाटील काशीम पटेल सलीम शेख, यशवंत कर्डिले , सचिन कर्डिले, शरद पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.