आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीपुणेराजकीयसामाजिक
त्या आंदोलनास भाजापा ओबीसी नेत्यांचा पाठिंबा.
आंदोलन स्थळी जाऊन भेट घेऊन अहमदपूर तालुक्याच्या वतीने पाठींबा जाहीर.

अहमदपूर/प्रतिनिधी विनोद मुंडे
महाराष्ट्रातील ओबीसींच्या न्याय हक्काच्या आरक्षणासाठी प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी सुरू केलेल्या वडगोद्री ता. आबंड जि.जालना येथील आमरण उपोषणाला मंगळवारी भेट देऊन अहमदपूर तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांनी जाहीर पाठींबा दिला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके,माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस ॲड.भारत भाऊ चामे,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी
वडगोद्री ता. आंबड जी. जालना येथे ओबीसी आरक्षण संदर्भात गेल्या एक आठवड्या पासून आमरण उपोषण सुरू असल्याने लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची उपोषण स्थळी भेट घेऊन अहमदपूर तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतिने पाठींबा दर्शविला.