शेतकऱ्यावर अस्मानी संकटाचा घाला क्षणात दीड लाखाचे नुकसान.
संपादक सुशिल वाघमारे 9765606143 Mahavarta News

महावार्ता न्यूज बीड: (प्र-विनोद मुंडे) अंबाजोगाई तालुक्यात शनिवारी दि.२१ दुपारी जोराच्या पावसाबरोबर विजांचा कडकडाट झाला. यात उजनपाटी परिसरात एका शेतकऱ्याच्या शेतात वीज पडले आणि दोन बैल दगावले. शेतकऱ्याचा मित्र असणाऱ्या या बैलांना गमवावे लागले.
उजनीपाटी येथील शेतकरी ज्ञानोबा माणिक मुरकुटे यांची १ हेक्टर शेती गट क्रमांक १३९ कातकरवाडी शिवारात आहे. शेतीवर त्याचा उदरनिर्वाह चालतो. शनिवारी दुपारी दोन च्या सुमारास विजांच्या कडकाटासह पाऊस झाला.याचवेळी शेतात झाडाखाली बांधलेल्या बैलावर विज कोसळली. दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. शेतीची मशागत करण्यासाठी ज्ञानोबा मुंडे यांनी सहा महिन्यापूर्वीच नवी दीड लाखाची बैलजोडी खरेदी केली होती. अस्मानी संकटाने शेतकऱ्यांची बैलजोडी हिरावून घेतली यात शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले. शासनाने शेतकऱ्यावर ओढावलेल्या संकटावर मात करण्यासाठी आर्थिक मदत करावी अशी जनतेतून मागणी केले जात आहे.