ओबीसीचे 100 आमदार निवडून येणे काळाची गरज-प्रा.लक्ष्मण हाके.
का म्हणाले नवनाथ वाघमारे त्यांना पाडा?

अहमदपूर महावार्ता न्यूज:ओबीसी, अल्पसंख्याक, भटक्या,दलीत समाजानी एकसंघ होऊन महाराष्ट्रात ओबीसीचे 100 आमदार निवडून आणने ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ओबीसी योध्दा प्रा. लक्ष्मण हाके यांनी अहमदपूर येथील महायल्गार मेळाव्यात केले.
अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सर्वराजकीय पक्षातील ओबीसी समाज बांधवांच्या पुढाकारातून अहमदपूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सकल ओबीसी, अल्पसंख्याक,विमुक्त भटक्या,दलीत समाजाचा विराट असा महायल्गार मेळावा आज संपन्न झाला. मेळाव्याच्या निमित्ताने अहमदपूर शहरात यात्रेचे स्वरूप आले होते.
अहमदपूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी नेतृत्वानी काळाची गरज म्हणून एकच उमेदवार निवडणूकीत उभा करून निवडून आणावा.ओबीसी मतदारांनी कोणत्याही मराठा उमेदवारांला मतदान न करता ओबीसीच्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कम उभे राहिले पाहिजे.आज महाराष्ट्रात ओबीसी बहूसंख्य असतानादेखील सर्व सत्ता केंद्र मराठा समाजाच्या हाती आहेत. ओबीसी समाजानी मराठा समाजाची गुलामगिरी सोडून ओबीसीचे स्वतंत्र अस्तित्व तयार करण्याचे अहवान प्रा. लक्ष्मण हाके यांनी अहमदपूर येथील ओबीसी अल्पसंख्याक दलित भटक्या विमुक्तांच्या महायल्गार मेळाव्यास संबोधीत करताना केले.
यावेळी नवनाथ वाघमारे यांनी मराठा नेत्यांचा मराठा आरक्षण व मनोज जरांगे यांचा खरपूस समाचार घेतला.
ओबीसी योध्दे प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची अहमदपूर शहरातून उघड्या जिप मधुन भव्य मिरवणूक काढून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, वि.दा.सावरकर, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सदरील मेळाव्यास माजी आमदार बब्रुवान खंदाडे, गणेश हाके,डॉ.अशोक सांगवीकर,एन. आर. पाटील, भारत रेड्डी, जिवणकुमार मद्देवाड, अॅड. भारत चामे,सांब महाजन,किशोर मुंडे,बालाजी रेड्डी,अशोक केंद्रे,त्रंबक गुट्टे, डॉ.नरसिंह भिकाणे,अॅड.माधवराव कोळगावे,सुरेश मुंडे, चंद्रकांत मद्दे, माधवराव भिंगोले, ज्ञानोबा बडगिरे, कलीमोदीन अहमद, अश्विनी कासनाळे,श्रीकांत बनसोडे,सरस्वती कांबळे,आत्माराम डाके,शेषराव राठोड, दिगंबर पोले,महेश बिलापट्टे, सुरेश हाके, ओम पुणे,गोपीनाथ जोंधळे,बालाजी गुट्टे, हणमंत देवकते,दादा उटगे,नाथराव केंद्रे,राम नरवटे,माणीक नरवटे लक्ष्मण मुकुटमोरे, रमाकांत आरनुरे,गजेन्द्र वलसे, हेमंत गुट्टे,रामानंद मुंडे, माणीक कानगुलकर,प्रकाश ससाने,जिवण गायकवाड,पांडू लोहकरे, जबारखा पठाण यांच्या सह अहमदपूर व चाकूर तालुक्यातील वीस ते पंचवीस हजार सकल ओबीसी , अल्पसंख्याक ,विमुक्त भटक्या दलित समाज बांधव महायल्गार मेळाव्यास उपस्थित होता.
प्रास्ताविक कु. अफिफा पठाण यांनी केले तर महायल्गार मेळाव्याचे सुत्रसंचालन व आभार गोविंद गिरी यांनी केले.