चाकुरात दहीहंडी महोत्सव उत्साहात साजरा
वैभव धोंडगे यांच्या पुढाकारातून युवकात स्फूर्ती.

चाकूर महावार्ता न्यूज प्रतिनिधी – येथील जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने दि.३ सप्टेंबर रोजी भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या दहीहंडी महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी पाटील , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष अॅड. प्रकाश सोमवंशी, जय भवानी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वैभव धोंडगे उपस्थित होते. यावेळी शहरातील तरुणांनी डीजेच्या तालावर नृत्य करून जल्लोष साजरा केला.
अहमदपूर येथील राजमुद्रा गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला. विजयी राजमुद्रा गोविंदा पथकास बालाजी पाटील अॅड. प्रकाश सोमवंशी, कृष्णा धोंडगे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
यासाठी कृष्णा धोंडगे,गणेश गांजुरे,गौरीशंकर सोनटक्के, गणेश साळुंके,अविनाश जाधव, माणिक मोरे, संतोष धोंडगे, प्रवीण सूर्यवंशी,महेश सोमवंशी,मंगेश धोंडगे, शिवकुमार मामदे, राम डाके आदींनी पुढाकार घेतला.