चाकूर तालुका पत्रकार मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी संतोष आचवले; सचिवपदी नितीन कुलकर्णी

चाकूर: चाकूर तालुका पत्रकार मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी वडवळ नागनाथ येथील पत्रकार संतोष आचवले यांची तर सचिवपदी चापोली येथील नितीन कुलकर्णी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
चाकूर तालुका पत्रकार पत्रकार मित्र मंडळाच्या अध्यक्ष आणि सचिवाच्या निवडी संदर्भात गुरुवारी (दिं.१५) चाकूर येथील मित्र मंडळाच्या कार्यालयात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप अंकलकोटे यांच्या अध्यक्षतेखाली तर संस्थापक सचिव निरंजन रेड्डी यांच्या उपस्थितीत मंडळाच्या सर्व सदस्यांची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी पुढील दोन वर्षासाठी पत्रकार मित्र मंडळाच्या तालुका अध्यक्षपदी संतोष आचवले यांची तर सचिवपदी नितीन कुलकर्णी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
या बैठकीस भरतसिंह ठाकूर, ओमप्रकाश लोया,मधुकर कांबळे, संग्राम होनराव,वैभव रेकुळगे,सलीम तांबोळी,यादव करडीले,धर्मराज साबदे,नवनाथ डिगोळे,शिवशंकर होनराव,मंगेश आडे यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
या निवडीबद्दल पत्रकार , मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन केलं जात आहे.