४० वर्ष सेवा करणाऱ्या सावरगावे यांचा असाही सेवागौरव.
सेवक ते वरिष्ठ क्लार्क असा प्रवास, तत्पर राहून केली सेवा.

चापोली प्रतिनिधी: येथील स्वामी विवेकानंद विद्यालय चापोली येथील वरिष्ठ लिपिक गोरखनाथ लक्ष्मण सावरगावे हे 40वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सेवापुर्ती गौरव सोहळात सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष बाबुराव शिंदे, विशेष अतिथी प.पु.भगवान महाराज तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष बालाजी सुर्यवंशी, संचालक चंदर तेलंगे,माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.पुंडलिक चाटे,माजी पोलीस पाटील सिराज देशमुख,स्व.राजीव गांधी विद्यालय बोळका येथील माजी मुख्याध्यापक मारोती तुपकर,केंद्रीय विद्यालय कमालनगरचे प्राचार्य राजेंद्र निटुरे , केंद्र प्रमुख अजीम शेख, माजी केंद्रप्रमुख बाळासाहेब धुपे मुख्याध्यापक व संचालक व्यंकटेश बाबुराव शिंदे,प्रा. दयानंद राजोळे, मुख्याध्यापक बाबु मुळके, सेवानिवृत्त शिक्षक माधव गादगे, सुनिल देशपांडे ,सौ.देवळे, विश्वनाथ धोंडापुरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.यानंतर विद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा व सावरगावे परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक व्यंकटेश शिंदे यांनी करताना गोरखनाथ सावरगावे यांनी या संस्थेची निष्ठेने केलेल्या सेवेचा आदर्श सर्व कर्मचार्यासाठी अनुकरणीय आहे असे सांगताना आज संस्थेचे व शाळेचे संकटमोचक सेवानिवृत्त होत आहेत आशा शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव केला.40 वर्षाचा अनुभव असलेले कर्मचारी सेवानिवृत्त होणे ही शाळेची व संस्थेची फार मोठी शती आहे असेही ते म्हणाले.यानंतर गोरखनाथ सावरगावे यांचा प.पु.भगवान महाराज व अध्यक्ष बाबुराव शिंदे सावित्रीबाई शिंदे यांच्या हस्ते विद्यालयाच्या वतीने सपत्नीक संपूर्ण आहेर देवून सत्कार करण्यात आला.
उपाध्यक्ष बालाजी सुर्यवंशी, सिराज देशमुख, मारोती तुपकर,सेवानिवृत्त शिक्षिका सौ.देवळे , सुनिल देशपांडे, व्यापारी मंगेश मद्रेवार व स्व.राजीव गांधी विद्यालय बोळका यांच्या वतीने गोरखनाथ सावरगावे यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी सौ.देवळे, सुनिल देशपांडे,माजी मुख्याध्यापक मारोती तुपकर, प्राचार्य राजेंद्र निटुरे,प.पु.भगवान महाराज यांनी आपल्या भाषणात गोरखनाथ सावरगावे यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.अध्यक्षीय समारोप उपाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांनी करताना त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्वाती मुसने व संजय बनसोडे यांनी केले तर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माधव होनराव यांनी सर्वाचे आभार मानले.