क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा महेश केसगिरे GATE परीक्षा उत्तीर्ण.
आय आय टी भिलाई येथे मिळाला प्रवेश.
अहमदपूर महावार्ता न्यूज : 22 जुलै तळेगाव येथील क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थी महेश सुधाकर केसगिरे याने क्राईस्ट शाळेतून दहावी-बारावीचे शिक्षण घेऊन पुढे इंजीनियरिंग आष्टा, सांगली येथे अण्णासाहेब डांगे इंजिनिअरिंग कॉलेजमधून पूर्ण केले. तो तिथेच न थांबता त्याने GATE – Graduate aptitude test of Engineering परीक्षा उत्तीर्ण केली. त्याला IIT भिलाई, छत्तीसगड येथे प्रवेश मिळाला. त्याचा शाळेचे संस्थाध्यक्ष जीवनकुमारजी मद्देवाड यांच्या हस्ते शाळेमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्राचार्य जेबाबेरला नादार , महेशचे वडील सुधाकर केसगिरे, व मातोश्री, शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे, मंगेश कडपुरकर, अशोक राय, गंगाधर सिरसाटे तसेच इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.
महेशने विद्यार्थ्यांना शाळेतील शिस्त तसेच येथील शिक्षकांची शिकवण्याची पद्धती अतिशय उत्कृष्ट आहे. ‘शालेय जीवनातच माझा पाया शाळेने पक्का केल्याने मला हे पुढील यश मिळत गेले. या शाळेचा मी ऋणी असल्याचे व्यक्त त्याने केले. प्रामाणिक अभ्यास केला तर यश नक्की मिळते असेही तो म्हणाला. तसेच संस्थाध्यक्षांनीही आपल्या भाषणात बोलताना आजच्या विद्यार्थ्यांनी जबाबदार, अभ्यासू, त्यागी बनणे गरजेचे आहे मात्र याचा आताच्या मुलांत याचा अभाव असल्याचे ते म्हणाले. मी आणि माझी शिक्षकांची टीम नेहमी विद्यार्थ्यांसाठी धडपडत असते विदयार्थी पालकांची साथ असणे अपेक्षित आहे.
स्वतःच्या यशाची चावी खरंतर स्वतः जवळच असते हे विद्यार्थ्यांनी जाणलं पाहिजे असंही ते म्हणाले. महेशच्या वडिलांनी ही मनोगत व्यक्त करताना शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थाध्यक्षांनी सांभाळून घेतलं म्हणूनच आज हे आमच्या कुटुंबात महेशला यश मिळालेलं आहे. आणि शाळेच्या शिक्षक टीमचेही आभार मानले. सूत्रसंचालन संगमेश्वर ढगे यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्यांनी मानले.