जगाला गांधी विचारांची आवश्यकता आहे-प्रा.आचार्य
लोकराजा अध्यापक विद्यालयात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त प्रतिपादन
अहमदपूर (महावार्ता न्यूज)महात्मा गांधीजींचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान अतुलनीय होते त्यांची सत्य व अहिंसा हा विचार जागतिक शांततेसाठी , मानवता आणि सामाजिक न्यायासाठी उपयुक्त आहेत आजचे जग हे हिंसाचार, स्वैराचार, भष्टाचार यांच्यात अडकले आहे यातून बाहेर पडायचे असेल तर जगाला गांधी विचारांशिवाय दुसरा मार्ग नाही त्याच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन विचारवंत प्रा बालाजी आचार्य यांनी बुधवारी ता २ आक्टोबर रोजी अहमदपूर येथील लोकराजा अध्यापक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमात केले.
या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रमेश तुरेवाले होते तर प्रमुख मार्गदर्शक प्रा बालाजी आचार्य ,प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक बालाजी गुळवे , सहशिक्षक गौतम कांबळे, सहशिक्षीका शिवकांता शिंदे प्रा भुजंगराव पाटिल आदि उपस्थित होते यावेळी मान्यवराच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर छात्र अध्यापिका कु साक्षी मोरे हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले.
यावेळी छात्र अध्यापक विद्यार्थी विद्यार्थीनीना मार्गदर्शन करताना प्रा आचार्य पुढे म्हणाले की गांधीजीच्या विचारांचा अवलंब केल्यास देशात राष्ट्रधर्म वाढीस लागेल, धर्माधर्मातील कलह मिटतील व सर्व समाज गुण्या गोविंदाने नांदू शकेल आणि मानवी जीवन सुरक्षित शांतता पूर्ण सुखी समाधानी व परिपूर्ण होईल म्हणून भविष्यातील चांगल्या जगासाठी गाधी विचारांची आवश्यकता आहे राष्ट्रातील सर्वच प्रश्नावर गांधीवाद हाच आशावाद असू शकतो त्यासाठी युवा पिढी, विवेकी आणि बुद्धीवादी लोकामध्ये चर्चा झाली पाहिजे अशी ही भूमिका मांडली या कार्यक्रमात तत्पूर्वी शिवकांता शिंदे , गौतम कांबळे बालाजी गुळवे यांनी हि समायोचित विचार व्यक्त केले अध्यक्षीय समारोप प्राचार्य रमेश तुरेवाले करताना म्हणाले की अहमदपूर शहरात नव्याने सुरू केलेल्या अध्यापक विद्यालयाला चागला प्रतिसाद मिळाला आणि वैचारिक दृष्टिकोनातून जयंती उत्कृष्ठ साजरी झाल्याने खूप आनंद झाला भविष्यात आदर्श समाज निर्मिती साठी कटिबद्ध राहू अशी शपथ घेतली या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचालन छात्र अध्यापिका आयोध्या नरवटे , भाग्यश्री भैयरवाड हिने केले तर शेवटी आभार कु अदित्य गुळवे यांने मांडले कार्यक्रमाला छात्र अध्यापक- अध्यापिका, सहशिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती