महायुती सरकार कडून हिंदु खाटीक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना
अ भा संतुजी ब्रिगेड च्या वतीने जल्लोष
लातूर महावार्ता न्यूज :दि ५ ऑक्टोंबर २०२४ अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड हिंदु खाटीक युवा संघटन च्यावतीने महायुती सरकारने हिंदु खाटीक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय दिनांक ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतल्याबद्दल महायुती सरकार चे जाहीर आभार मानत महात्मा गांधी चौक लातूर येथे जल्लोष करण्यात आला आहे
आधुनिक युगात ही जुनाट,पारंपरिक पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या व्यावसायिक लहान प्राण्याच्या मांस विक्रीवर उपजीविका भागविणाऱ्या समाजाला , तरुण बेरोजगार युवकांना आर्थिक मदत करून सक्षम करण्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय घेवून अनुसूचित जाती प्रवर्गातील हिंदु खाटीक गोरगरीब, वंचित समाजाला न्याय दिला आहे.
अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड च्या वतीने महाराष्ट्र हिंदु खाटीक समाजाचे नेते अँड व्यकटराव बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदने, धरणे, छत्रपती संभाजी नगर येथील आयुक्त कार्यालय समोर निदर्शने, हिवाळी अधिवेशन नागपूर उपोषण आंदोलन,मुंबई आझाद मैदान येथे उपोषण आंदोलनातून महायुती सरकार चे लक्ष वेधी आंदोलने करण्यात आली होती या लढ्यात महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला आहे त्यांचे ही आभार अँड प्रदिपसिंह गंगणे यांनी व्यक्त केले आहे
आज आर्थिक विकास महामंडळाच्या निर्णयाचे स्वागत करीत महात्मा गांधी चौक लातूर येथे फटाक्याच्या आतिष बाजी करीत, एकमेकांना पेढा भरवून, घोषणाबाजी करत
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा ना अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, ना गिरीश महाजन, ना संजय बनसोडे , ना चंद्रशेखर बावनकुळे, आ कृपाल तुमाने, आ विक्रम बाप्पा काळे,माजी आ सुधीर पारवे , माजी आ राजू पारवे तसेच महायुती सरकार प्रतिनिधींचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले आहे यावेळी अँड प्रदिपसिंह गंगणे, संतोष क्षीरसागर कुर्डवाडी, ज्येष्ठ समाजसेवक विश्वनाथ इंगळे, नरसिंह घोणे,दिगबर कांबळे, ओमप्रकाश आर्य,साईनाथ घोणे, भारत थोरात,गोविंद वंजारे,राजू बुये, इंद्रजित गंगणे, अनिल कांबळे,महेश विजापूरे , शिवाजी तपासे,योगेश डोंगरे , दिपक गंगणे, अँड सुहास बेंद्रे,युवराज वंजारे जिल्हाप्रमुख युवा सेना,सुशील साबणे, किरण कांबळे, रोहित थोरात प्रदेशाध्यक्ष युवा आघाडी,नंदकिशोर गंगणे, रोहित रुमने, प्रमोद गंगणे, मुन्ना कांबळे उपजिल्हाप्रमुख मागासवर्गीय आघाडी शिवसेना,दत्ता घोणे, सागर डोंगरे, पांडुरंग गंगणे , विजयकुमार डोंगरे, विक्की कांबळे, तानाजी फिस्के, विनोद डोंगरे, बालाजी कांबळे, अमन घोलप, चैतन्य फिस्के, हरिओम तपासे, राहुल सौदागर विलास वंजारे, बालाजी रत्नपारखे, महेन्द्र गायकवाड, अतिश नवगिरे, जिल्हाध्यक्ष शंकर नागभुजंगे, गोविंद कांबळे आदी उपस्थित होते.