इंद्रायणीच्या” दारात वाढली गर्दी, सुसंवाद साधत असंख्य होताहेत विकासकामांमुळे दर्दी.
अहमदपूर चाकूर मतदार संघात आमदार बाबासाहेब पाटील हॅप्पी हॅट्रिक मारणार का?
महावार्ता न्यूज अहमदपूर: शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थानी अहमदपूर शहर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ग्रुप, चाकूर आणि मोहरम समितीच्या पदाधिकाऱ्यानी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला.
अहमदपूर चाकूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेतली. विविध विषयावर चर्चा केली. विकासाभिमुख केलेल्या कामांचा विचार करून चाकूर अहमदपूर विधानसभेला पुन्हा आमदार म्हणून बाबासाहेब पाटील हेच नेतृत्व करावेत या भूमिकेतून थेट राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश केला.
यावेळी चाकूर येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ग्रुप अध्यक्ष शेख सद्दाम , शेख इर्शाद खाजासाब, शेख अजहर दस्तगीर, शेख अबुजर, शेख असकम साहेबलाल, शेख इब्राहिम अन्वर, शेख हकिम इस्माईल, शेख शादुल मंजलसाब, शेख तालिबसाब रहीम, शेख तयब, शेख अजीम, सय्यद जुबेरसाब आदी प्रवेश झाला.
सोबतच चाकूर शहरातील मोहरम सवारी कमिटीतील सदस्य शेख शाकीर, शेख वसीमराजा, शेख वजीर, कुबडे अन्सार, शेख जमशेद, शेख अफरोज, शेख गुलाब, शेख मिनाज, चाँद कोतवाल, शेंडगे प्रल्हाद, किरण कुलकर्णी, हामीद शेख यांचा पक्ष प्रवेश संपन्न झाला.
नियमितपणे होणारे पक्षप्रवेश पाहता इंद्रायणीवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, प्रामाणिकपणे जात धर्म पंथ विसरून जनतेसाठी कार्य केले आहे,करत राहतोय याचीच ही पावती आहे. दररोज असंख्य लोक प्रवेश करत आहेत यामुळे माझे बळ वाढत आहेत. ही जनताच माझी फार मोठी ताकद आहे. येणाऱ्या काळातही प्रलंबित विकासकामे मला खेचून आणायची आहेत. याकामी जनतेचे पुन्हा आशीर्वाद जगजेचे आहेत असे सुसंवाद साधताना म्हणाले.
या पक्षप्रवेश प्रसंगी आ बाबासाहेब पाटील राष्ट्रवादीचे अहमदपूर ता. अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, चाकूर शहराध्यक्ष शिवशंकर हाळे, माजी नगरसेवक इलियास सय्यद, नगरसेवक मुन्ना मौलाना , मतीन गुळवे, अनिल वाडकर,
अहमदपूर शहराध्यक्ष अजहर बागवान, माजी नगरसेवक रहीम पठाण, शेख शेखुभाई, बाबूभाई रुईकर, मेजर पाषाभाई, नबी सय्यद, इलियास सय्यद, ॲड. सादिक शेख, सय्यद गैबी साब हाळणीकर, शेख जिलानी , फेरोज सय्यद, संदीप पांचाळ, चंद्रमनी सिरसाठ तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.