ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसंपादकीयसामाजिक

चाकूर शहरातील दुतर्फा डिव्हायडरसह रस्त्याला ३८ कोटीची मंजुरी.

चाकूर शहराच्या वैभवात भर पडणार!

चाकूर प्रतिनीधी : चाकूर शहरातून गेलेला मुख्य रस्ता नागपूर रत्नागिरी या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असून, शहरासाठी रस्ते विकास महामंडळांकडून 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यातून दुतर्फा रस्ता, दुभाजक व स्टेट लाईट व चौकाचे काम होणार असल्यामुळे चाकूर शहराच्या वैभवात भर पडणार आसल्याचे नगराध्यक्ष कपील माकणे यांनी सांगितले.

 

शहरातून गेलेला मुख्य रस्ता म्हणजे नागपूर रत्नागिरी हा महामार्ग असून या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.पण शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर डांबरीकरण करून चाकूरकरांच्या डोळ्यांचे पाणि पुसले गेले. मात्र शहराचे मागासलेपण कायम राहून गेले होते याची खंत नगराध्यक्ष कपिल माकणे यांना हमेशा होत असल्याचे सांगीतले.त्यामुळे

  • शहराचे वैभव डोळयांसमोर ठेवून महामार्ग प्राधिकरण यांच्याशी सतत पत्र व्यव्हार करून केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही पाठपुरावा करुन शहरातील दुतर्फा रस्ता,मधोमध दुभाजक व स्टेट लाईट मंजूर करून घेण्यासाठी या महामार्ग प्राधिकरणाकडून तब्बल 37 कोटी 74 लाख रुपये मंजूर करून घेतले आसुन रेस्ट हाऊस ते तहसील कार्यालयापर्यंत दुभाजकासह रस्ता करण्यात येणार असून उर्वरित रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे .अशी माहिती चाकूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कपिल माकणे यांनी सांगितले.

 

शहरात मात्र मुख्य रस्त्यावर डांबरीकरण करून दिले आसुन या रस्त्यावर सतत खड्डे पडत असल्यामुळे वाहनधारकांना याचा खुप त्रास होत असून, रस्त्या लगत असलेल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. हा शहरातील रस्ता दुतर्फा नसल्यामुळे चाकूर हे तालुक्याचे शहर आहे असे दिसून येत नव्हते व शहराच्या वैभवात ही भर पडत नव्हती.यासाठी मात्र लोकप्रतिनिधींनी चाकूर शहराच्या वैभवाचा व तालुक्यातील जनतेच्या विचारांचा अद्याप विचारच केला नसल्यामुळे हा रस्ता झाला नाही जर विचार केला असता तर या महामार्गांसोबतच या रस्त्याचे काम पूर्ण झाले असते असे जनतेतून बोलले जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button