३५८ प्रशिक्षित जवान देशसेवेसाठी सज्ज चाकूरच्या सीमा सुरक्षा दलाच्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्रात शपथ समारंभ
संपादक सुशिल वाघमारे चाकूर
चाकूर (महावार्ता न्यूज) चाकूर येथील बीएसएफ,सीमा सुरक्षा दलाच्या सहायक प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित झालेले ३५८ जवान देशसेवेसाठी सज्ज झाले आहेत. या जवानांचा परेड शपथ समारंभ शुक्रवारी ११ ऑक्टोंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज परेड ग्राऊंडवर दिमाखात पार पडला.या शपथ परेडची सलामी सहायक प्रशिक्षण केंद्र,सीमा सुरक्षा दल, चाकूरचे महानिरीक्षक विनीत कुमार यांनी घेतली.
या भव्य शपथ परेडचे नेतृत्व हवालदार महेंद्र सिंह यांनी केले.या जवानांचे प्रशिक्षण दि.२७ नोव्हेंबर २०२३ ते ११ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत ४४ आठवडे होतें.जवानांचे मूलभूत प्रशिक्षण महानिरीक्षक विनीत कुमार व सहाय्यक प्रशिक्षण केंद्राचे कमांडर मदन पाल सिंग यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली पूर्ण झाले.
यामध्ये हरियाणा,राजस्थान,बिहार,झारखंड,उत्तर प्रदेश,आंध्र प्रदेश,ओरिसा,मणिपूर व पंजाब या राज्यातील जवानांचा समावेश आहे.या प्रशिक्षणादरम्यान या जवानांना शारीरिक कार्यक्षमता,शस्त्रे,दारुगोळा,फिल्ड,क्राफ्ट,नकाशा वाचन आणि फिल्ड इंजिनियरिंगचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या शिक्षणाशिवाय अंतर्गत सुरक्षा कर्तव्य,सीमा व्यवस्थापन, कायदा आणि मानवाधिकाराचेही प्रशिक्षण देण्यात आले आहे.
यावेळी जवानांना संबोधित करताना महानिरीक्षक विनीत कुमार म्हणाले की,प्रशिक्षणानंतर त्यांना भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेशच्या विशाल सीमेच्या सुरक्षेसाठी तैनात केले जाईल.हे सैनिक भारताच्या सीमेवरील कठीण प्रसंगांना तोंड देण्यास सक्षम आहेत.सीमा सुरक्षा दलात पाठवून आपल्या शूर पुत्रांना देशसेवेसाठी समर्पित करणाऱ्या त्यांच्या पालकाप्रती महानिरीक्षक विनीत कुमार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी त्यांनी परेड मैदानावर उपस्थित अभ्यागत,विशेष पाहुणे,मान्यवर,शाळकरी मुले आणि प्रसारमाध्यमांचे आभारही व्यक्त केले.
पंकज सैनी यांना सुवर्णपदक प्रदान करन्यात आले.
” या समारंभात प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट कामगिरी
करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना चाकूरच्या सीमा सुरक्षा दलाच्या सहायक प्रशिक्षण केंद्राचे महानिरीक्षक विनीत कुमार यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यावेळी बॅच क्रमांक १८४ क्रमांकाच्या बॅचमधून कॉन्स्टेबल पंकज सैनी यांना सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सुवर्णपदक मिळाले,बॅच क्रमांक १८५ मधुन सर्वप्रथम नागेंद्र कुमार यांनी प्राप्त केले.