नगराध्यक्षांनी विजयादशमी दिनी घेतले जनमाता देवीचे दर्शन
चाकूर : चाकूर तालुक्यातील हाळी खुर्द (खुर्दळी) येथील नवसाला पावणाऱ्या सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या जनमाता देवीचे दर्शन विजयादशमी निमित्ताने चाकूर चे नगराध्यक्ष कपिल माकणे यांनी घेतले. यावेळी पंचायत समितीच्या माजी उपसभापती लता चांडसुरे, युवा नेते सागर होळदांडगे, रत्नदीप चांडसुरे, मनोज आलमाजी आदी उपस्थित होते.
मान्यवरांनी मंदिर व परिसराची पाहणी करून विश्वस्त मंडळाचे कौतुक केले. यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शरद पाटील, सचिव ज्ञानोबा जाधव, कोषाध्यक्ष संगमेश्वर जनगावे, विश्वस्त तथा श्री दत्त मंदिर मठ संस्थान लखनगाव चे मठाधिपती आबा महाराज गिरी, पांडुरंग शिंदे, वार्षिक अन्नप्रसादाचे प्रमुख जगदीश भोसले, पोलीस पाटील साहेबराव पाटील, माजी उपसरपंच पांडुरंग भोसले, वामन नरहरे, हावगिराज जनगावे, शिवगीर गिरी, विनोद पाटील, विकास पाटील, गणेश हाक्के, अंबादास बिडवे, महेश बिडवे, जब्बार पटेल, गोरख सूर्यवंशी, विशाल नरहरे, ऋषि नरहरे, ईश्वर रेड्डी, महमंद शेख, पांडुरंग बिडवे, राहूल जाधव, रूद्र जाधव, श्रीकांत चव्हाण, सोमनाथ सांगवे, गंगासागर बिडवे, संजीवना बिडवे यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.