लिंगायत आरक्षण मोर्चात सामील होण्यासाठी चाकुर तालुक्यांतील वडवळ ना येथे शिवा संघटनेच्या वतीने आवाहन..
महावार्ता न्यूज नेटवर्क संपादक सुशिल वाघमारे

चाकुर: दि. २३ (महावार्ता न्यूज) लिंगायत समाजाला आरक्षण मिळवन्यासाठी “शिवा संघटना व सकल लिंगायत समाज, लातूर च्या माध्यमातुन ” 30 ऑक्टोबर 2023 वार सोमवार लातूर च्या गंजगोलाई येथून भव्य धड़क मोर्चा निघणार आहे. ” जास्तीत जास्त, लिंगायत बांधव,उपस्थित राहावे.
यासाठी चाकुर तालुक्यातिल सर्व गावात प्रचार- प्रसार व नियोजन साठी प्रवास सुरु आहे. दि.23 ऑक्टोबर 2023 सोमवारी सकाळी10:00 वाजता वडवळ नागनाथ येथे मोर्चा संदर्भात बैठक घेण्यात आली.या बैठकीला राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत शेटे शिवा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष अंतेश्वर तोडकरी शिवा कर्मचारी तालुका अध्यक्ष उदगीर रामेश्वर कदम माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील शिवभक्त पारायण भगवंतराव पाटील चांबरगेकर, मनमथ पालापुरे यांच्यासह गावातील समजबांधव महीला उपस्थित होते.
यावेळी वडवळ येथील जनतेला संबोधित करताना आरक्षणाचा लढा हा समतेसाठी उभा केला असून तो आपल्या हक्क आहे. म्हणून लातूर येथे होणाऱ्या लिंगायत समाज आरक्षण मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन शिवा संघटनेच्या वतीने करण्यात आले.