लोकसभा निवडणुकीत भाजपा वर्चस्व कायम राखण्यासाठी प्रयत्नशील – डिगोळे

महावार्ता न्यूज: भारतीय जनता पार्टी कार्यालय चाकूर येथे शनिवारी भाजपा स्थापना दिन सकाळीं १० च्या सुमारास साजरा करण्यात आला. भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आली.प्रसंगी तालुका अध्यक्ष वसंतराव डिगोळे, ता सरचिटणीस अंकुश जनवाडे, न.प. उपनगराध्य अरविंद बिरादार, माजी नगरसेवक रवींद्र कुलकर्णी,
प्रदेश कार्यकारणी सदस्य युवा मोर्चा युवराज पाटील,ओबीसी ता. अध्यक्ष अशोक शेळके,विस्तारक सिद्धेश्वर पवार,शहर अध्यक्ष प्रशांत बिबराळे,ता उपाध्यक्ष संतोष माने,अल्पसंख्यांक ता. अध्यक्ष हकानी सौदागर,ता. उपाध्यक्ष राजीव डिगोळे,उमाकांत शेटे,बाळू कांबळे,ता. उपाध्यक्ष संजय माकणे, बापूराव चिटबोने,अनिल जोशी, रामदास खंदारे असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना वसंतराव डिगोळे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून. गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गर्शनाखाली पक्ष बंधणी जोमाने होत आहे. देशात सरकार सुयोग्य कामगिरी करत आहे यामुळे देश बळकट होताना दिसून येत आहे.
देशात शांतता प्रस्थापित करून येणाऱ्या काळात शेतकरी सन्मान, बेरोजगारीवर आळा, सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा देशात भारतीय जनता पार्टीचे सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहिला पाहिजे. यासाठी युवाशक्तीने जागृत झाले पाहिजे. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने तन-मन-धन लावून लोकसभेत आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. असे मत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष वसंतराव डिगोळे यांनी प्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना व्यक्त केले.