स्वातंत्र्य सैनिक बळीरामजी सोनटक्के यांच्या जीवनशैलीचा आवलंब करावा- आमदार बाबासाहेब पाटील

स्वातंत्र्य सैनिक बळीरामजी सोनटक्के यांचे ९९ व्या वर्षात पदार्पण
चाकूर महावार्ता न्यूज:आजच्या पिढीने स्वातंत्र्य सैनिक बळीरामजी सोनटक्के यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीचा आवलंब करून सदृढ, निरोगी, क्रियाशील दीर्घायुष्य जगावे असे मनोगत वाढदिवसानिमित्त आमदार बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष कपिल माकणे, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या ज्योती बहेनजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मातृशक्ती स्थळ म्हणून सुपरिचित असलेल्या चाकूर येथील माय मंदिर येथे आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य सैनिक बळीराम बापूराव सोनटक्के (चाकूर जि.लातूर) यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्वातंत्र्य सैनिक बळीरामजी सोनटक्के यांनी सदृढ, निरोगी, क्रियाशील आयुष्याची ९८ वर्षे पूर्ण करून ९९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्याबद्दल आप्तस्वकीय, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या वतीने त्यांचे अभिष्टचिंतन करून दीर्घायुष्याची कामना करण्यात आली.
यावेळी आमदार बाबासाहेब पाटील, नगराध्यक्ष कपिल माकणे, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या ज्योती बहेनजी, सुशिला नागिमे बहेनजी, दत्ता पाटील, संजय मिरकले , अशोकराव मिरकले,अनिल वाडकर,धनंजय जाधव, जय जवान साखर कारखान्याचे माजी संचालक बालाजी सुर्यवंशी, प्रगतिशील शेतकरी देविदासराव होळदांडगे, शंकर सोनटक्के, संभाजी सोनटक्के, राष्ट्रीय खेळाडू शिवकुमार सोनटक्के, साग होळदांडगे, विशाल विविध सोसायटीचे संचालक अजयकुमार नाकाडे, संदीप शेटे, राष्ट्रवादी सेवा दलाचे तालुकाध्यक्ष शिवदर्शन स्वामी, रिपब्लिकन पपन कांबळे, श्रीकांत चव्हाण, अँड.बसवेश्वर जनगावे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.