शाहू विद्यालय शेळगाव येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा
महावार्ता न्यूज संपादक सुशिल वाघमारे

चाकूर महावार्ता न्यूज : तालुक्यातील शाहू विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त गुरुवारी विद्यार्थ्याची रॅली काढण्यात आली .यानिमित्त विविध घोषवाक्यांचे बॅनर दाखविण्यात आले. भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 झाली तसेच 25 जानेवारी 2011 पासून प्रत्येक वर्षी 25 जानेवारी हा दिवस “राष्ट्रीय मतदार दिन” म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
भारतातील नागरिकांना मतदार म्हणून त्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे हा या मागचा उद्देश आहे लोकशाहीत मताला स्वतःचे महत्व आहे. या दिवसाचे महत्व सांगण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक हाके एन बी. तथा सुगावे बालाजी चंद्रकांत स्काऊट मास्टर यांच्या मार्गदर्शन खाली रॅली व घोषवाक्ये तयार करण्यात आले.
आपल्या देशात 18 वर्ष पूर्ण केलेल्या आणि मतदार यादीत नाव असणाऱ्या प्रत्येकाला मत देण्याचा अधिकार आहे.धर्म, जात, वर्ण, संप्रदाय अथवा लिंग या निकषावर भेदभाव न करता कुणालाही हा अधिकार बजावता येऊ शकतो.या वेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.