मोबाईल चोरास अटक, 46 हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांची आठवडाभरतील दुसरी धाडसी कारवाई.

चाकूर महावार्ता न्यूज : तालुक्यातील आष्टामोड येथील शांताई हॉटेल वरून मोबाईल घेऊन पळ काढणाऱ्या आरोपिस दुसऱ्या दिवशी चाकूर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तब्बल 46 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
तालुक्यातील आष्टामोड येथील शांताई हॉटेल वरून दि.16 फेबू 24 रोजी सकाळी 10 वाजण्याचे सुमारास हॉटेल चालक सुनिल शिवाजीराव ठाकुर वय 42 वर्ष रा. आष्टामोड ता. चाकूर जि. लातूर व आशा जाधव असे शांताई हॉटेलवर काम करीत होते. त्यांच्या मोबाईलची चार्जिंग संपल्यामुळे त्यांनी तो मोबाईल चार्जिंगला लावलेला असता त्याचवेळी शरद अर्जुने रा. गांजूर हा माझ्या हॉटेलच्या खुर्चीवर बसला होता, मी माझा मोबाईल चार्जीगला लावून काउंटरवर ठेवून गिराईक करीत होतो मी गिराईक करत असताना माझे हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसलेले ग्राहक संदीपान विठठल गुरमे याने सांगीतल की तुमचा चार्जीगला लावलेला काउंटरवरचा मोवाईल शरद आर्जुने हा घेवून पळून जात आहे, असे म्हणटल्याने हॉटेल चालक व हॉटेलवर असलेले दोघे, तिघेजन त्याचे पाठीमागे लागले पण तो मोबाईल घेवून पूलाचे खालून आष्टागावचे दिशेने ज्वारीचे उभे पिकात घूसला आम्ही त्याचा ज्वारीचे पिकात शोध घेतला परंतू तो सापडला नाही,त्यामुळे सुनिल शिवाजीराव ठाकुर यांनी पोलीस स्टेशन चाकुर येथे हजर होवून एक लेखी तक्रार दिली. त्यानुसार चाकूर पोलीस स्टेशन मध्ये गु.र.न.- 68/2024 कलम 379 भादवी मधील नमूद आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांच्या कडून 1) ओपो एफ, 21 एस. प्रो. कंपनीचा मोबाईल कि. 20,0000/- रु 2) ओपो सी.पी.एच. 2477 कंपनीचा मोबाईल कि. 18,000/- रु 3) एक तोशीबा कंपनीची एल.ए.डी. टिव्ही कि. 8,000/- रु एकूण 46,000/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास. पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना /1276 बी. बी. मामडगे , पोलीस स्टेशन चाकूर हे करित आहेत.