स्वामी विवेकानंद मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारोह संपन्न.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ...
महावार्ता न्यूज चापोली: येथील रामगीर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थीना प.पु.भगवान महाराज यांच्या हस्ते शुक्रवारी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामगिर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबुराव शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ व्यापारी व जगत जागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अर्जुन मद्रेवार, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुकाध्यक्षा शकुंतला शेवाळे,जगन्नाथ मद्रेवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्यंकटेश शिंदे यांनी केले. प्रास्ताविकाच्या माध्यमातून विविध स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या सर्वांगीण विकासबाबत माहिती देण्यात आली. विद्यालयाच्या वतीने विविध उपक्रम कसे राबविले जातात.
यातून एकता कशी निर्माण केली जाते. ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास कशाप्रकारे घडवून आणला जातो हे मुख्याध्यापक व्यंकटेश शिंदे यांनी मांडले.
एन. एन.एम. एस. परीक्षेमध्ये विषेश प्रविन्य प्राप्त पात्र ठरलेल्या अनुष्का बोंबडे, किरण शेवाळे, काळे अर्पिता, श्रीमंगले प्रतिक्षा, उडगे प्रथमेश, स्नेहा सोमवंशी, यांचा सत्कार करण्यात आला. तर राष्ट्रीय प्रज्ञांशोध परीक्षेत गोल्ड मेडल प्राप्त अस्मिता कुंटे, श्रद्धा तुडमे,स्नेहल स्वामी, आनंदी बिबराळे, होनराव ऋतुजा, यांनी यश संपादन केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
विद्यालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित वयक्तिक सांघिक अश्या अनेक स्पर्धा घेण्यात येतात. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येते. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या अवस्थेत साधून स्वामी विवेकानंद प्राथमिक माध्यमिक विद्यालय मान्यवरांच्या हस्ते विचाराला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती मुसने यांनी केले तर आभार प्राथामिक चे मुख्याध्यापक माधव होनराव यांनी मांडले.