विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष शाळा व्यवस्थापन व अध्यापनाचा अनुभव.
चाकूर : महावार्ता न्यूज – जगत् जागृती शिक्षण प्रसारक मंडळ चाकूर द्वारा संचलित, जगत् जागृती विद्या मंदिर चाकूर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन उत्साहात पार पडला. प्रत्यक्ष विद्यार्थ्यानी घेतला अध्यापनाचा अनुभव.
या एक दिवसीय स्वयंशासन दिनामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळा ताब्यात घेऊन सुंदर , शिस्तबद्ध शाळेचे संचलन केले .यामध्ये मुख्याध्यापक पदाची जबाबदारी अंकिता शिंदे हिने पार पाडली तर उप मुख्याध्यापक म्हणून तौहिद सय्यद आणि पर्यवेक्षक म्हणून प्रतीक्षा पालापुरे या विद्यार्थ्यांनी विद्यालयाची धुरा समर्थपणे सांभाळली.
विद्यार्थी शिक्षकांनी संपूर्ण दिवस अध्ययन अध्यापनाचे उत्कृष्ट कार्य केले. विद्यार्थी शिक्षकांमधून उत्कृष्ट शिक्षकांची निवड विद्यालयातील शिक्षकांच्या वतीने करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक धनश्री देवशेट्टे द्वितीय क्रमांक तौहिद सय्यद आणि तृतीय क्रमांक संस्कृती पाटील यांनी पटकावला. यासह अनेक विद्यार्थ्यांनी प्रभावी अध्यापनाचे कार्य केले.
या स्वयंशासन दिनामध्ये सेवकांची भूमिका सरफराज शेख, अरबाज शेख आणि अजिज शेख या विद्यार्थ्यांनी पार पाडली.
स्वयंशासन दिनाच्या या सुंदर उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव नरेश पाटील चाकूरकर, अध्यक्ष सर्वोत्तमराव कुलकर्णी, उपाध्यक्ष अर्जुन मद्रेवार ,सहसचिव बाबुराव बिडवे, कोषाध्यक्ष सोमनाथ स्वामी, संस्थेचे संचालक अॅड.विक्रम पाटील चाकूरकर, विठ्ठलराव सोनटक्के, शिवप्रसाद शेटे , राजकुमार कदम, महादेव काळोजी यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
हा स्वयंशासन दिन यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता स्वामी,पर्यवेक्षक प्रदीप ऊस्तुर्गे , जेष्ठ अध्यापक संजय नारागुडे आदी सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.