मनोरंजन
नांदेड रोडवरील जिजामाता कन्या प्रशाले समोरील चौकाला नाव देण्याची व्ही एस पँथर्स ची मागणी
जिल्हाध्यक्ष शरद किणीकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर

लातूर: दि.३० (महावार्ता न्यूज)येथील व्ही एस पँथर्स युवा संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने सं अध्यक्ष विनोद खटके आणि प्रदेशाध्यक्ष सचिन मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष शरद किणीकर यांच्या नेत्रत्वाखाली मंगळवारी लातूर शहर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.निवेदनाद्वारे नांदेड रोडवरील जिजामाता कन्या प्रशाले समोरील चौकाला माता रमाई चौक असे नामकरण करून माता रमाई जयंतीपूर्वी सुशोभीकरण करण्यात यावेअन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला .
यावेळी संघटनेचे संपर्क प्रमुख आनंद जाधव, जिल्हाध्यक्ष शरद किणीकर, कामगार आघाडी जिल्हा संघटक गोविंद कांबळे,देवा गायकवाड, विलास कसबे,प्रशांत सातपुते, अमोल कांबळे, मारुती कांबळे, सह इतर पदाधिकारी उपस्थित होते ..