विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखावे – डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे
महावार्ता न्यूज /सुशिल वाघमारे

लातूर: (8 सप्टेंबर) येथील लोकमाता अहिल्यादेवी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट महाविद्यालय, लातूर मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ” जागतिक साक्षरता” दिनानिमित्त नवीन शैक्षणिक धोरण : आजचा विद्यार्थी या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे शैक्षणिक संचालक डॉ. पी.एन. सगर, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय,लातूर येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. हर्षवर्धन कोल्हापूरे व प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थाध्यक्ष प्राचार्य.एकनाथ पाटील व ब्रिलीयंट महाविद्यालयाचे ग्रंथपाल तथा प्रभारी प्राचार्य युवराज बी. अंधोरीकर यांची उपस्थिती होती. “नवीन शैक्षणिक धोरण : आजचा विद्यार्थी” या विषयावर मार्गदर्शन करताना शैक्षणिक धोरणातील महत्वाच्या बाबी यावेळी सर्वांसमोर मांडल्या.
त्याचप्रमाणे विद्यार्थी हा समाजाचा केंद्र बिंदू आहे आणि त्याने समाजाला काही देणं असत ,विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी जीवाचे रान केले पाहिजे तसेच नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव मिळणार आहे यामुळे आपल्यामधील विवेकाचा विकास प्रत्येकाने केला पाहिजे असेही मत यावेळी त्यांनी मांडले.
संस्थाध्यक्ष प्राचार्य.एकनाथ पाटील यांनी मार्गदर्शन करताना मुलींच्या साक्षरतेच्या प्रमाणात मुलांच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, केवळ लिहता वाचता येणे म्हणजे साक्षरता नसून माहिती तंत्रज्ञान यांचा पण उपयोग करणे काळाची गरज बनली आहे असे मत मांडले. अध्यक्षीय समारोपामध्ये डॉ.पी. एन सगर यांनी आयुष्यात अपयशी झालेले लोकच इतिहास घडवतात त्यामुळे अपयशाला न घाबरता आपले ध्येय विद्यार्थ्यांनी साध्या केले पाहिजे असे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.बळीराम मोठेराव यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.अर्चना धनवे व प्रा.सोनाली कांबळे तर आभार प्रभारी प्राचार्य प्रा.युवराज बी. अंधोरीकर यांनी मानले. या कार्यक्रमास प्रा. दिलीप दाडगे,प्रा.प्रियंका गोमचाळे, प्रा.प्रियंका नाईक, प्रा. मनाली आगलावे, प्रा. बुशरा शेख आदी सह रासेयो स्वयंसेवक मोठया संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परमेश्वर लवटे, दयानंद भारती, गणेश लवटे, अजय सांडूर यांनी परिश्रम घेतले.