चाकूर तालुक्यातील शेकडो युवा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
महावार्ता न्यूज/ सुशिल वाघमारे... आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्र्वास ठेवून प्रवेश..

चाकूर येथील युवानेते सुरज पटणे आणि शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. इंद्रायणी निवासस्थानी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील यांनी स्वागत करून सन्मान केला. तिवघाळ, खुर्दळी, रुद्रवाडी, चाकूर, घारोळा, घरणी, बोथी, अजनसोंडा बु., नागथेवाडी आदी गावातील तरुणांचा समावेश आहे.
चाकूर तालुक्यातील तरुण सहकाऱ्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध असेल. या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ मिळणार आहे. आमदार म्हणून अहमदपूर चाकूर मतदारसंघाच्या विकासासाठी मी अहोरात्र कार्यरत असून कुठलाही भेदभाव न करता मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे मत आमदार बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, तालुका उपाध्यक्ष गणपतराव नितळे, यशवंतराव जाधव, गणपत आबा कवठे, शिवानंद हेंगणे, तुकाराम जाधव, समाधान जाधव, भीमराव पाटील, पप्पू सावंत, पांचाळ, मनोज पाटील, बळीराम पाटील यांच्यासह सुरज पटणे यांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.