जरांगे पाटील यांच्या उपोषणाला साथ देत,टाकळगावात मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरु.
महावार्ता न्यूज संपादक सुशिल वाघमारे

चाकूर: (महावार्ता न्यूज)
दि.३१ मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील टाकळगाव येथे साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.
मंगळवार पासून हे साखळी उपोषण सुरु केले असून राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला ४० दिवसाचा वेळ दिला होता. ही मुदत २४ ऑक्टोबर रोजी संपल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अंतरवली सराटी येथे उपोषणास प्रारंभ केला आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील टाकळगाव येथे मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले.
यावेळी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. या साखळी उपोषणात गावातील उमराव सावंत,उत्तमराव सावंत,नामदेव मांडुरके,अंतेश्वर पाटील,हणमंतराव सावंत,चंद्रकांत सावंत,व्यंकटराव सावंत,सूर्यकांत सावंत,विठ्ठल सावंत,उद्धवराव पाटील,विनोद सावंत,भाऊसाहेब सावंत,यशवंतराव सावंत,गणपतराव सावंत,मारोती हंबीर,प्रताप सावंत,संभाजी मांडुरके,प्रतिक विलास सावंत, विलास रामराव सावंत, संजय वाघमारे,चंद्रशेखर कांबळे आदींनी सहभाग घेतला.