बीआरएसचे नेते उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली आनंदवाडी येथील युवकांचा बीआरएसमध्ये प्रवेश..

भारत राष्ट्र समितीचे अहमदपूर चाकूर विधानसभेचे नेते उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली (बीआरएस) पक्षामध्ये रविवारी चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथील अनेक कार्यकर्ते पदाधिका-यांनी जाहीर प्रवेश केला.
यावेळी आनंदवाडी येथे प्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कपील धावड यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा संपन्न झाला.
प्रारंभी आनंदवाडी येथे पूर्ण गावातून रँली काढण्यात आली.
या मेळाव्यास संबोधित करताना उत्तमराव वाघ यांनी तेलंगणा सरकारने राबविलेल्या विविध विकासाच्या योजना, शेतकरी,सामान्य नागरिकांना विकासाचा केंद्रबिंदू ठेवून मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी विकासाला गती दिली आहे.त्या पार्श्वभूमीवर (बीआरएस)पक्षामध्ये चाकूर तालुक्यातील विविध भागातून इनकमींग सुरु झाल्याचे बोलत होते.
या कार्यक्रमाला योगेश बडगीरे,प्रल्हाद बडगीरे,चेतन सुर्यवंशी,विलास भंडारे,अंकुश बोमदरे,पञकार माधव वाघ,नारायण चामलेवाड,कालीदास पासमे,परमेश्वर भंडारे,सतिश बडगीरे,वैजनाथ दंडीमे,कृष्णा बेंबडे,विक्रम धावड,अंकुश बडगीरे,गणेश बडगीरे,संजय आरदवाड,शिवाजी बडगीरे,चेतन बेंबडे,शेषराव सुर्यवंशी,व्यंकटी सुर्यवंशी,हरी चामलेवाड,नारायण चामलेवाड,महादेव चामलेवाड,व्यंकटी काळे,बालाजी पस्तापुरे,गोपाळ चामलेवाड,भानुदास पस्तापूरे,विठ्ठल शिंदे,महेश सुर्यवंशी आदीसह कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.