आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ज्ञानासोबत गुणात्मक कौशल्य आत्मसात करावी प्रा श्रीहरी वेदपाठक
महावार्ता न्यूज संपादक सुशिल वाघमारे

चाकुर:(महावार्ता न्यूज) राधेय चॅरिटेबल ट्रस्ट संचलित डी.बी.कॉलेज ऑफ फार्मसी महाळंग्रा येथील डी.बी.इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट ऍन्ड रिसर्चमध्ये शै. वर्ष २०२३ मध्ये बी. फार्मसी व डी.फार्मसीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रॅम व स्वागत समारंभ उत्साहात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.श्रीहरी वेदपाठक बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिनेश बेंबडे,कॅंम्पस डायरेक्टर विवेक बेंबडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.श्रीहरी वेदपाठक, प्रा.तुकाराम तेलंगे,डी.बी.इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च चे प्राचार्य डॉ.श्रीकांत ढगे,डी.बी. पब्लिक स्कूलचे प्राचार्य विशाल जाधव डी.बी.कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.जयदीप यादव उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय सुरुवातीला प्राचार्य डॉ. जयदीप यादव यांनी करून दिला.कार्यक्रमाचे प्रमुख मार्दर्शक प्रा.श्रीहरी वेदपाठक यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले आयुष्यात विद्यार्थ्यानी ज्ञानाबरोबर गुणात्मक कौशल्ये जपली पाहिजेत, नुसते चांगले मार्क्स मिळवून आजच्या युगात टिकणे कठीण आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाची सवय जोपासायला हवी, वेळेचे नियोजन करायला शिकायला हवे, समाजातील सध्याच्या परिस्थितीचे निरिक्षण केले पाहिजे. समाजाला उत्तम सेवा देणारा व्यक्ती म्हणून विद्यार्थ्याने स्वतःला घडवलं पाहिजे. पुढे विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्राध्यापक श्रीहरी वेदपाठक यांनी संस्थेचे अध्यक्ष दिनेश बेंबडे यांच्या कार्याचा गौरव केला.
महाळंग्रासारख्या खेड्यात दिनेश बेंबडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मोठी संस्था उभारण्याचं धाडस केलं यासारखं रिस्क मॅनेजमेंटचे दुसरे चांगलं उदाहरण नसेल म्हणून विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही चांगलं कार्य कसं करावे याचा आदर्श म्हणून दिनेश बेंबडे सरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असेही त्यांनी सुचवले.प्रा.तुकाराम तेलंगे म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत व्यायाम करुन निरोगी शरीर प्राप्त करावे.त्यामुळे अभ्यासातील एकाग्रता वाढेल.आजच्या काळात इंग्रजी कम्युनिकेशन स्किल आत्मसात करण्यावर भर द्यावा.त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळविण्यास मदत होईल.
अध्यक्षीय समारोप करताना दिनेश बेंबडे यांनी प्रथम चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले व प्रा.श्रीहरी वेदपाठक यांनी केलेले मार्गदर्शन आत्मसात करण्याच्या सूचना दिल्या. पुढे बोलताना अध्यक्ष म्हणाले संस्थेची सुरुवात खूप खडतर परिस्थितीतून झाली असून सत्याच्या मार्गावर वाटचाल केल्यामुळे खडतर परिस्थितीतून सुखरूप बाहेर आलो. काहीही झाले तरी विद्यार्थ्यांनी खचून न जाता प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याचे धैर्य दाखवावे व आयुष्यात यशस्वी व्हावे यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन प्राध्यापक अश्विनी रोडे यांनी केले, सूत्रसंचालन फायनल इयर बी. फॉर्म मधील रोशनी केवटे व भाग्यश्री धुमाळ यांनी केले. त्यानंतर नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केले संपूर्ण कार्यक्रम चालू असताना शिक्षकांनी मिस्टर अँड मिसेस फ्रेशर ची निवड केली यामध्ये प्रथम वर्ष बी फार्मसी मधून रोशनी कांबळे हिने मिसेस फ्रेशरअवॉर्ड मिळाला तर डी फार्मसी फर्स्ट इयर मधून संकेत चव्हाण याने मिस्टर फ्रेशर चा आवाज मिळवला.
प्राचार्य यांच्या हस्ते दोघांना पुरस्कार देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी प्राचार्य डॉ. जयदीप यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी काम पाहिले.