मनोरंजन

क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये रास गरबा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा. चाकुर,अहमदपूर,जलकोट, लोहा तालुक्यातून पालक उपस्थित.

महावार्ता न्यूज नेटवर्क संपादक सुशिल वाघमारे

अहमदपूर, चाकुर, जळकोट व लोहा तालुक्यातून पालक व नागरिकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती
अहमदपूर ता:महावार्ता न्यूज दि.21 ऑक्टोंबर रोजी शनिवारी रात्री क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये रास गरबा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या सीईओ रितू मद्देवाड, प्रमूख अतिथी डॉ. वर्षा भोसले, इनरव्हील क्लब अध्यक्षा शितल मालू,डॉ.मनकर्णा चिवडे,डॉ.पल्लवी कदम, कांचन काडवादे,ज्योती काळे,डॉ पल्लवी कराड, पी टी ए जॉइंट सेक्रेटरी प्रदीप तेलंग, शिवकन्या नलवाड, डॉ. भरत हाके, डॉ रामदास होळकर, डॉ. संजय वारकड, डॉ. बालाजी सोमावार, मुणवर शेख, मानसी पाटिल, ॲड देवानंद महालींगे, प्राचार्य जेबाबेरला नादार, समन्वयक अनामिका शाह यांची प्रमुख उपस्थिती होती.

अहमदपूर, चाकुर, जळकोट व लोहा तालुक्यातून अनेक पालक, PTA मेंबर्स, विद्यार्थी, हजारोच्या संख्येने बाल गोपाळासोबत जनसागर कार्यक्रमासाठी उत्साहाने एकत्र जमा झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतिथींचा शाळेच्या वतीने मानसन्मान करण्यात आला. अहमदपूर तालुक्यातील महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे सचिव शिवाजीराव गायकवाड, कार्याध्यक्ष उदय गुंडीले, कोषाध्यक्ष बालाजी पारेकर, समन्वयक मासूम शेख, सदस्य संदीप गुंडरे इ पत्रकार बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत पालक वर्गातून तसेच विद्यार्थ्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. कार्यक्रमाची सुरूवात इयत्ता सातवी ते दहावीच्या मुलींच्या समूह नृत्याने कारण्यात आली. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षिका, पुरुष, महिला, अनेकांनी रास गरबा नृत्याचा मनसोक्त आनंद घेतला.

कार्यक्रमाच्या शेवटी बेस्ट गरबा नृत्य सादर करणारे पुरुष पालक गोविंद चिंचोले व महिला पालक शिवानी शेटे, माध्यमिक विद्यार्थिनी शरयू पाटिल, विद्यार्थी निहाल पटेल, प्राथमिक मधून विद्यार्थिनी राजेश्वरी धनुरे, शाळेची शिक्षिका खुशबू खुष्वाहा यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन अभिनंदन करण्यात आले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे तर सूत्रसंचालन दिव्या यादव, शेली नाथ, रत्ना यादव यांनी केले. कार्यक्रम शाळेतील सर्व शिक्षकांच्या, कर्मचाऱ्यांच्या टीमच्या सहकार्याने यशस्वी पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button