बालविवाह रोखण्यासाठी रासेयो स्वंयसेवकांनी कार्य करावे- प्रा.डॉ.मलिकार्जुन करजगी
रोसेयो स्वयंसेवकांनी ज्ञानासोबत चारित्र्य संपन्न नागरीक बनावे

चाकूर ( महावार्ता न्यूज) येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय युवक शिबीर” युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास” या शिर्षकाखाली 24 जानेवारी ते 30 जानेवारी 2024 या कालवधीत संपन्न संपन्न झाले. शिबीराचा समारोप 30 जाने. रोजी लोकायत शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. पी.डी. कदम यांच्या अध्यक्षतेखाली , प्रमुख पाहुणे स्वा. रा.ती.म.वि. नांदेड चे रासेयो संचालक डॉ. मलिकार्जुन करजगी, प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे, सरपंच सौ. प्रचिता संजय भोसले, उपसरपंच रमेशशिंदे, ज्ञानेश्वर जाधव, संजय जाधव, हावमीराज जनगावे, गणेश जाधव, संजय भोसले, पांडूरंग विडवे, कार्य क्रमाधिकारी डॉ. नामदेव गौंड, प्रा. मंगल माळवदकर, प्रा. रमेश शिंदे, डॉ. सुमित देशमुख, प्रा. बबिता मानखेडकर, प्रा. स्वाती नागराळे, प्रा. सुलभा गायकवाड, प्रा. राजेश विभुते, सामनाचे पत्रकार सुधाकर हेमनर यांच्या उपस्थितित संपन्न झाला.
समारोप प्रसंगी डॉ. करजगी म्हणाले रासेयो चे स्वयंसेवक देशाची सर्वात मोठी युवा शक्ती आहे ग्राम व शहर विकासासाठी ही शक्ती सकारात्मक विचार घेऊन क्रियाशील झाली पाहिजे पर्यावरण रक्षण, जलसाक्षरता, वृक्षसंवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रीय ऐक्यासाठी सामाजिक समरसता निर्माण करण्यासाठी व आज संत महात्म्यांच्या महाराष्ट्र बालविवाहाचे प्रमाण वाढल आहे- बालविवाह रोखण्यासाठी रासेयो स्वंयसेवकांनी जन जागृती करावी व ग्रामस्थांच्या साह्याने लोकचळवळ उभी करावी तसेच ज्ञानासोबत रासेयो स्वयंसेवकांनी चारित्र्य संपन्न नागरीक बनावे असे संबोधित केले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी ॲड. पी.डी. कदम म्हणाले राष्ट्रीय सेवा योजना ही बिनभिंतीच महाविद्यालय असुन श्रमसंस्कार व सेवा संस्कार करणारे केंद्र आहे, श्रमा शिवाय जगात कांहीही मिळणार नाही, रासेयो स्वंयसेवकांनी प्रचंड प्रयत्न केले पाहिजे तरच यश तुमच्या पायावर लोटांगण घालेले, कष्टाला पर्याय नाही, बालविवाह रोखण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे विचार व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे यांनी शिबिर यशस्वी केल्या बद्दल ग्रामस्थांचे , रासेयो कार्यक्रमाधिकारी, स्वंयसेवकांचे आभार व्यक्त केले.
शेख महमद, सुरने आशिष, रत्नदीप शिवनगे, समीर पठाण, अंकिता चेऊलवार या स्वंयसेवकांनी व ग्रमस्थांच्या वतीने हावगीराज जनगावे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक प्रा. मंगल माळवदकर, सुत्रसंचलन डॉ. नामदेव गौंड यांनी केले उत्कृष्ठ स्वयंसेवक म्हणून झांबरे श्रीनाथ, शेख महमद, समीर पठाण यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, आभार प्रा. रमेश शिंदे यांनी मानला शिबीराच्या यशस्वीतेसाठी हिरामन राठोड यांनी कार्य केले
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.