अ.भा.रविदासिया धर्मसंघठनेच्या जिल्हाध्यक्ष पदी माधव सुर्यवंशी यांची निवड

चाकूर–दि.1. (महावार्ता न्यूज) अखिल भारतीय रविदासिया धर्मसघठनेच्या लातूर जिल्हाध्यक्ष पदी माधव सुर्यवंशी चाकूरकर यांची निवडीची घोषणा पुणे येथे करण्यात आली.
अखिल भारतीय रविदासिया धर्मसंघठनेचे 20 वे अधिवेशन आणि गुरु रविदास मंदीर तिसरे धामचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.अखिल भारतीय रविदासिया धर्मसंघठनेचे चेअरमन 108 संत निरंजनदासजी महाराज (पंजाब) आणि राष्ट्रीय अध्यक्ष संत सुखदेव महाराज यांच्या आशीर्वादाने प्रदेशाध्यक्ष बालाजी दुधंबे यांच्या हस्ते निवड करुन सत्कार करण्यात आला.यावेळी प्रदेश महासचिव अमोल वाघमारे महाराज, प्रदेश कार्याध्यक्ष बिभीषण सांगवीकर ,प्रदेश सहसचिव धर्माजी उदबाळे,मार्गदर्शक माजी प्राचार्य डाॕ.कमलाकर कांबळे,माजी वैद्यकीय अधिकारी डाॕ.एस.के.शिंदे, उपस्थित होते.माधव सुर्यवंशी यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.