लातूर लोकसभा निवडणुकीत रेकॉर्डब्रेक मताधिक्याने खा.श्रृंगारेच विजयी होतील – माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर
संपादक सुशिल वाघमारे

महावार्ता न्यूज लातूर: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान योजना, दुष्काळी अनुदान, महिलांना 33 टक्के राजकीय आरक्षण या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केलेले आहे. सध्याच्या जाहीरनाम्यामध्येही समान नागरी कायदा, युवकांच्या हाथाला काम व लातूर जिल्ह्यातील शेती व उद्योगांना पाणी उपलब्ध करून देण्याचे धोरण हाती घेण्यात आलेले आहे. याबरोबरच लातूर शहर व जिल्ह्याच्या विकासामध्ये भर पडण्यासाठी अनेक विकास कार्य हाती घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे विकासाच्या प्रवाहात कायमस्वरूपी राहण्यासाठी लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या पाठीशी उभे रहा आणि विकासाच्या माध्यमातून साधलेल्या विकासात्मक संवादामुळे लातूर लोकसभेच्या निवडणुकीमुळे रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने खा.सुधाकर श्रंगारेच विजयी होतील असा विश्वास भाजपा नेते तथा राज्याचे कामगार कल्याण मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
यावेळी ते कव्हा रोड भाागातील जिंदल टॉवर येथे भारतीय जनता पार्टी, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट, रिपाई आठवले गट, रासप व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खा.सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ आयोजित मंडळाध्यक्ष व बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी या मेळाव्याला लातूर लोकसभेचे प्रभारी किरण पाटील, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, माजी शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे,सुधीर धुत्तेकर,अॅड.शैलेश गोजमगुंडे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, प्रदेश सचिव प्रेरणाताई होनराव, दिग्विजय काथवटे, नगरसेविका भाग्यश्रीताई शेळके, धनंजय हाके, महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्ष मिनाताई भोसले, प्रविण सावंत, बालाजी शेळके, शिरीष कुलकर्णी, मंडळाध्यक्ष संजय गिर, गणेश गवारे, सुभाषअप्पा सुलगुडले, मंडळ सरचिटणीस बाळासाहेब शिंदे, राजेश पवार, आकाश पिटले, सतीश माने, शशिकांत हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक व कार्यकर्त्यांच्या मनात भाजपा पक्ष रूजलेला आहे. पक्षाची ध्येय धोरण आणि संकल्पपत्र आत्मसात करून नव्या उमेदीने आणि उत्साहाने आत्मविश्वासाने कामाला लागा. 2047 मध्ये भारत देशाची वाटचाल महासत्ता होण्याकडे सुरू आहे. त्यामुळे सर्व पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लातूर लोकसभेचे उमेदवार खा.सुधाकर श्रृंगारे यांच्या पाठिशी सक्षमपणे उभे रहा असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
या मेळाव्याचे प्रास्ताविक संजय गिर यांनी केले. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा संयोजन समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार दत्ता बोरूळे यांनी केले. यावेळी या कार्यक्रमाला सर्व मंडळाध्यक्ष, बुथप्रमुख व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.