सर्व धर्म समभाव जोपासणाऱ्या खा. सुधाकर शृंगारेला मोठ्या मताधिक्याने विजयी करा – देशमुख
संपादक सुशिल वाघमारे

महावार्ता न्युज:(अहमदपूर)प्रतिनीधी खा.सुधाकरराव श्रृगांरे यानां मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना मत गेल्या पाच वर्षांत खा. सुधाकरराव श्रृगांरे यांनी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मतदारसंघात आणुन सर्वधर्म समभाव जोपासत सर्व धर्माचे,महापुरुषांचे उत्सव स्वखर्चाने करून सर्वधर्म समभाव जोपासण्याचे महाण कार्य सुधाकरराव श्रृगांरे यांनी केले असल्याने मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे अहवान भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी केले आहे.
भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार खा. सुधाकरराव श्रृगांरे यांना मत म्हणजे विकासाला मत, पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीना मत.
गेल्या दहा वर्षात देशाचा ज्या गतीने विकास झालेला आहे या विकासामुळे देशाची प्रतिमा व जगातील उंची वाढलेली आहे आज देश एक समृद्ध राष्ट्र निर्भीड राष्ट्र व आर्थिक विकासाकडे झिपावणारा राष्ट्र अशी प्रतिमा जगात निर्माण झाली आहे हा लौकिक भारताने गेल्या दहा वर्षात कमावलेला असून देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशात सर्वच क्षेत्रात झालेला विकास होय असे मत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
म्हणून लातूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने कोणत्याही खोट्या आफवानां बळी न पडता फुकटची आश्वासने देऊन काँग्रेस मत मागत आहे. सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही कारण काँग्रेसचे कारकीर्द ही भ्रष्टाचार आणि बडबडली होती त्यामुळे विकासावरती काँग्रेस कधीच बोलत नाही जात पात धर्म यावरती मत मागून काँग्रेसने अनेक वर्ष या देशात सत्ता केली परंतु आता या देशातील जनता जागृत झालेली आहे. चांगलं वाईट ओळखायला लागलेली आहे आणि म्हणूनच दहा वर्ष माननीय नरेंद्र मोदी यांना देशाने सत्ता सोपविली होती म्हणून लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी सुधाकर शृंगारे यांना प्रचंड मताने निवडून देऊन देशाच्या विकासात आपलाही वाटा ,सहभाग द्यावा असे आव्हान भाजपा चे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी केले आहे .