एका महिलेसह 10 पुरुषांनी,लातूर लोकसभा मतदारसंघात गुरुवारी 11 नामनिर्देशनपत्रे दाखल
संपादक सुशिल वाघमारे

महावार्ता न्यूज लातूर, दि. 18 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 41-लातूर लोकसभा मतदारसंघात गुरुवार, 18 एप्रिल 2024 रोजी 11 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. तसेच 15 व्यक्तींनी 30 नामनिर्देशनपत्रे प्राप्त करून घेतली.
लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडे 18 एप्रिल रोजी दाखल नामनिर्देशनपत्रे- नरसिंगराव निवृत्ती उदगीरकर (अपक्ष), मच्छिंद्र गुणाजी ऊर्फ गुणवंतराव कामंत (बहुजन भारत पार्टी), मच्छिंद्र गुणाजी ऊर्फ गुणवंतराव कामंत (अपक्ष), सुधाकर तुकाराम श्रंगारे (भारतीय जनता पार्टी),
रवींद्र स्वामी (अपक्ष), काळगे शिवाजी बंडप्पा (इंडियन नॅशनल काँग्रेस), अॅड. प्रदीप एस. चिंचोलीकर (अपक्ष), लखन राजाराम कांबळे (राष्ट्रीय बहुजन पार्टी), डॉ. अनिल सदाशिव कांबळे (भारतीय जनता पार्टी), सुधाकर तुकाराम सूर्यवंशीं (अपक्ष), पपीता रावसाहेब रणदिवे (अपक्ष).असे प्रत्येकी दोन नामनिर्देशन दाखल केले आहेत यात एकच महिला आहेत. येणाऱ्या काळात अनेक अर्ज दाखल होतील मात्र ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र मात्र सध्या सोशल माध्यमावर झळकताना दिसून येत आहे..