निष्कलंक व निर्मळ मनाच्या खा. सुधाकर शृंगारेला मोठ्या मताधिक्याने विजयी करा- खंदाडे
सुशिल वाघमारे संपादक महावार्ता न्यूज नेटवर्क

महावार्ता न्यूज लातूर; निष्कलंक व निष्पाप असलेल्या खा. सुधाकरराव श्रृगांरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे अहवान अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी केले आहे.
खा. सुधाकरराव श्रृगांरे यानां मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना मत गेल्या पाच वर्षांत खा. सुधाकरराव श्रृगांरे यांनी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मतदारसंघात आणुन सर्वधर्म समभाव जोपासत सर्व धर्माचे,महापुरुषांचे उत्सव स्वखर्चाने करून सर्वधर्म समभाव जोपासण्याचे महाण कार्य सुधाकरराव श्रृगांरे यांनी केले असल्याने मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे अहवान माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी केले आहे.
भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार खा. सुधाकरराव श्रृगांरे यांना मत म्हणजे विकासाला मत, पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीना मत.
गेल्या दहा वर्षात देशाचा ज्या गतीने विकास झालेला आहे या विकासामुळे देशाची प्रतिमा उंचावली असुन आज देश एक समृद्ध राष्ट्र निर्भीड राष्ट्र व आर्थिक विकासाकडे झेपावणारा राष्ट्र अशी प्रतिमा जगात निर्माण झाली आहे हा लौकिक भारताने गेल्या दहा वर्षात कमावलेला असून देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशात सर्वच क्षेत्रात झालेला विकास होय .पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोणा काळात मोफत लस पुरवठा करुन अन्नधान्य पुरवठा करुन जनतेला दिलासा दिला.
राष्ट्रीय महामार्ग,विमानसेवा,वंदेभारतरेल्वे यांचे जाळे निर्माण केले.शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवून चंद्रयान यशस्वी केले.स्वताच्या आईचे अंत्यसंस्कार करुन दसऱ्या तासांत देशाच्या सेवेसाठी कार्यरत राहणारे,गेल्या पंचवीस वर्षांत एक दिवसाची विश्रांती न घेता देश सेवा करण्यासाठी कार्यमग्न राहणारे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निर्मळ मनाच्या खा. सुधाकरराव श्रृगांरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे अहवान माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी केले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार,व्ही.एस.टी.एफ.(ग्रामोथान)योजना, अशा अनेक योजना प्रभाविपणे राबविल्या .जिवाची परवा न करता कोविडच्या महामारी काळात जनतेच्या सुरक्षेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहणत घेतली. खा. सुधाकरराव श्रृगांरे यांनी कोविडच्या महामारी काळात मतदारसंघात अन्नधान्याचे मोफत किट वाटप करुन जनतेला दिलासा देण्याचे काम केले होते.
स्वच्छ प्रतिमा, निष्कलंक असलेल्या खा सुधाकरराव श्रृगांरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे अहवान माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी केले आहे .